३ वर्षापासुन चोरीच्या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपीच्या स्थानिक गुन्हे जळगाव शाखेने आवळल्या मुसक्या.
जळगांव – मा.डॉ.श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक सो, जळगाव, मा. कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक सो. चाळीसगाव, व श्री अभयसिंह देशमुख, सहायक पोलीस अधीक्षक, चाळीसगाव भाग, श्री. किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि गणेश चौभे, सफौ विजयसिंग पाटील, पोह सुधाकर अंभोरे, पोह लक्ष्मण पाटील, पोह अक्रम शेख, पोह किरण चौधरी, पोकॉ ईश्वर पाटील, सर्व नेम स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव, पोकॉ राहुल पाटील अशांचा पथक नेमुण पाहिजे असलेले आरोपींबाबत माहिती काढून रितसर कारवाई करणे बाबत सुचना दिल्या होत्या.
श्री. किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांना गुप्त बातमी मिळाली की, चाळीसगाव शहर पोस्टे गुरन २४४/२०२९ भादवि कलम ३७९ मधील पाहिजे असलेला आरोपी नामे जगदिश बाळु शेळके रा पथराड, ता भडगाव हा पथराड भागात येणार असल्याची गोपनिय माहिती प्राप्त झाल्याने वर नमुद पोलीस पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी दि. २५/०२/२०२४ रोजी पथराड ता. भडगाव येथुन शिताफीने पकडुन त्यास नांव गाव विचारता त्याचे नांव आरोपी नामे जगदिश बाळु शेळके, वय २३ रा पथराड, ता भडगाव असे सांगीतल्याने त्यास ताब्यात घेवून विचारपुस करुन पुढील कायदेशिर कारवाई करीता चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे ताब्यात देण्यात आले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377