भडगाव-पाचोरा नगर परिषद क्षेत्रातील मंजूर विकास कामांनी जनता सुखावली

पाचोरा ,दि.१९- भडगाव-पाचोरा मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांचा विकास कामांचा धडाका सुरूच असून जनसेवेचे त्यांचे ध्येय बघता भडगाव-पाचोरा विधानसभा क्षेत्रातील विकास बघता त्यांचे इतके कामे कदाचित कुणीही करीत नसणार असच चित्र सध्या पहावयास मिळत आहे.या मतदार संघातील ग्रामीण भाग असो व शहरी सर्वच ठिकाणी विकास गंगा नुसती वाहत नाही तर ओवरफ्लोव झालीय असे चित्र निर्माण झाले आहे.मुंबईला मंत्रालयात गेले म्हणजे काय विकास कामांची मंजुरी आणतात याची प्रतीक्षाच जणू जनता करीत असते. एक विकसनशील नैतृत्व मतदार संघाला लाभल्याचे सूर कायम ऐकावयास मिळते.
आ.किशोर पाटील यांनी दि १९ .नोव्हें रोजी पत्रकार परिषद घेऊन विकास कामांची यादी जाहीर करून आपल्या कार्याचा ठसा उमटविला मतदार संघातील जनतेस निर्माण होणऱ्या अडचणी वेळीच जाणून त्यावर तत्पर कारवाईस लागून ते कार्य तडीस नेता हे त्यांचे कार्यकुशल पनातून दिसून येते.
भडगांव नगर परिषद / पाचोरा नगर परिषद क्षेत्रातील मजूर कामे अशी आहेत
भडगांव नगर परिषद ता. भडगांव जि. जळगांव
कामाचे नाव
१)भडगांव नगरपरिषद हद्दीतील आदर्श कन्या विद्यालय ते नविन कोर्ट पर्यंत कोल्हा नाला लगत रिटेनिंग वॉल (सरंक्षण भिंत) बांधकाम करणे – १५० लक्ष
२)भडगांव नगरपरिषद हद्दीतील इंदर कॉम्पेक्स ते एम.के. पाटील यांच्या घराकडे जाणारा रस्ता काँक्रिटीकरण व चौक सुशोभिकरण करणे- ५० लक्ष
३)भडगांव नगरपरिषद हद्दीतील पारोळा रोड ते भवानी मंदीराकडे जाणारा रस्ता काँक्रिटीकरण करणे-५० लक्ष
४) भडगांव नगरपरिषद हद्दीतील न.पा. स्वच्छता पार्क ते यशवंत नगर मधील खदानीकडे जाणारा रस्ता काँक्रिटीकरण करणे- ५० लक्ष
५) भडगांव नगरपरिषद हद्दीतील सहस्त्रबुध्दे गल्ली समोरील बुरुज ते इदगाह मैदानवरुन जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे ५० लक्ष
६) भडगांव नगरपरिषद हद्दीतील मारुती मंदीरपासुन ते अँग्लो उर्दु शाळा ते सुर्यवंशी डेअरीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे ५०लक्ष
७) भडगांव नगरपरिषद हद्दीतील नवनाथ टेकडी ते काशिनाथ नगर कडे जाणारा रस्ता काँक्रिटीकरण करणे ५० लक्ष
८)भडगांव नगरपरिषद हद्दीतील वार्ड नं. ८ साई नगर अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे ५० लक्ष
एकुण रक्कम रुपये ५ कोटी रूपये.
पाचोरा नगर परिषद ता. पाचोरा जि. जळगांव
कामाचे नाव
१) नगरपरिषद मालकीच्या सि.स.नं. ३९७४/३/२/१ पैकी मधील क्षेत्र १५६०.०० चौ.मी. जागेवर स्व. तात्यासाहेब आर. ओ.पाटील व्यापारी भवनाचे बांधकाम करणे ५००.०० लक्ष
२) चिंतामणी कॉलनीत डॉ. गणेश राठोड यांच्या घरापासून ते एकनाथ पाटील यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करणे -७५ लक्ष
३) चिंतामणी कॉलनीत श्री. व्हि. एन. पाटील यांच्या घरापासून ते जयकिरण प्रभाजी शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करणे-७५ लक्ष
४) पाचोरा शहरात पुनगांव रोड ते नॅशनल हायवेला जोडणारा डि. पी. रोड लगतचा पक्का कॉक्रिटचा नाला बांधकाम करणे -१०० लक्ष
५) प्रभाग क्र. ८ मधील रोड ते सार्वजनिक बांधकाम विभाग, शासकीय विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करणे -१०० लक्ष
६) प्रभाग क्र. ७ मधील संभाजी राजे चौक ते इंदिरा नगर कडील राष्ट्रीय महामार्ग पर्यंत रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करणे – ७० लक्ष
७) पाचोरा नगरपरिषद हद्दीतील प्रभात ७ मधील यशोदा नगर,संगिता निवास ते जैन स्थानक पर्यंत रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करणे -४० लक्ष
८) नितीन चौधरी यांच्या घरापासुन ते पंढरी पाटील यांच्या घराकडील रिंग रोडला जोडणारा रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करणे-४० लक्ष
अशी एकुण रक्कम रुपये रक्कम 15 कोटी ची विकास कामे मजूर झाले असून यामुळे विकासाचा टप्पा दिवसंदिवस वृद्धिंगत होत आहे. जनतेतूनही या बद्दल कौतुक केले जात असून परिसरातून विकास कामांचे समाधान व्यक्त होत आहे

खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



