पाचो-यात लिंगपिसाटांची दहशत – अल्पवयीन बालिकेवर अत्याचार

पाचोरा,दि १– शहरातील कृष्णापुरी भागात राहणाऱ्या बत्तीस वर्षे तरुणाने त्याच्या घरी खेळण्यासाठी आलेल्या एका सहा वर्षीय अल्पवयीन बालिकेवर अत्याचार केल्याची घटना दि ३१/8/२०२२ रोजी दुपारी 2.३० वा घडली असून सदर आरोपी पाचोरा पोलिसांच्या अटकेत आहे सदर आरोपीवर 399/2022 भारतीय दंड विधान कलम 376 अ,ब व बाल लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4,6,8,12 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. सदर ईसमास बाल न्यायालय जळगाव येथे पुढील कारवाईसाठी नेण्यात आलेले आहे
घटनेबाबत हकीकत समजते की पिडीतेच्या आजीने दिनांक ३१/ ८/२०२२ रोजी आरोपीविरुद्ध पाचोरा पोलीस स्टेशन येथे फिर्याद नोंदविली असून आरोपी राहुल नामे या व्यक्तीने तिच्या नातीस त्याच्या घरी खेळण्यासाठी आले असता दुष्कृत्य केले सदर घटनाही दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडलेली असून याबाबत फिर्यादीने या गोष्टीची उकल होताच पाचोरा पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा नोंदविला सदर घटनेची माहिती मिळतात उपविभागीय पोलीस अधिकारी श्री भरत काकडे, किसनराव नजन पाटील, पोलीस उपनिरीक्षक विजया वसावे यांनी घटनास्थळाला भेट दिली. या पुढील तपास पीएसआय विजया वसावे या करत असून आज रोजी आरोपीस जळगाव येथील बाल न्यायालयात हजर करण्यात आले होते अशी माहिती उशिरा पोलीस सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



