राजकीय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जळगाव विमानतळावर स्वागत

जळगाव,दि.27- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासन आपल्या दारी अभियानातंर्गत जळगाव जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी आज दुपारी जळगाव विमानतळावर आगमन झाले. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी खासदार रक्षाताई खडसे, आमदार चंद्रकांत पाटील, चिमणराव पाटील, किशोर पाटील, श्रीमती लताताई सोनवणे, महापौर जयश्रीताई महाजन, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक बी. जी. शेखर पाटील, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे,जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया, महानगरपालिका आयुक्त विद्या गायकवाड यांनीही मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.

खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



