सिंगापूर येथे डॉ.अंकुर झंवर “द अचीव्हर्स अवॉर्ड २०२२” ने सन्मानित

पाचोरा तालुक्यातील प्राईम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मधील हृदयरोग विशेषज्ञ डॉ.अंकुर अनिल झंवर यांना नुकताच सिंगापूर येथे ” द अचीव्हर्स अवॉर्डस २०२२ ” ने सन्मानित करण्यात आले आहे. डॉ.अंकुर यांनी आतापर्यंत इंटर्वेंशनल कार्डियोलॉजी या विषयात केलेल्या भरीव कामगिरी व दिलेल्या योगदानामुळे हा मानाचा असा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. त्यांनी एवढ्या कमी वयात १०००० पेक्षा जास्त कार्डियाक अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी यशस्वी रित्या करण्याचा जणू एक नवा किर्तीमानच स्थापित केला आहे. या सोबतच भारतातील सर्वात तरुण ५० हृदयरोग विशेषज्ञ यामध्ये देखील त्यांनी आपले नाव दाखल केले आहे, त्यासाठी त्यांचे जळगाव जिल्ह्यतील व पाचोरा, भडगाव, जामनेर या तालुक्यातील आणि संबंधित पंचक्रोशित विशेष कौतुक होत आहे.

खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



