आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र
Trending

पाचोरा नगरपरिषदेच्या कर वसूली पथकाची धडक कारवाई जिओ मोबाईल कंपनीचा मोबाईल टॉवर सिल.


पाचोरा,दि.20 पाचोरा येथील नगरपरिषदेच्या विविध कर वसूलीची धडक मोहीम मुख्याेधिकारी शोभा बाविस्कर यांच्याप मार्गदर्शनाखाली न.पा.अधिकारी, कर्मचारी तिव्रतेने करीत आहेत. अनेकदा सुचना, नोटीसा देऊन देखील थकबाकी वसूल होत नसल्या.ने दि.19 जानेवारी रोजी झालेल्याथ धडक मोहीमेत तलाठी कॉलनी भागातील थकीत मालमत्ताधारकांकडून तसेच रक्कम रुपये 4,16,975/- मात्र थकबाकी असल्याने जीओ कंपनीचा टॉवर बंद करण्याची धडक कार्यवाही करण्यात आली. त्याच प्रमाणे काही थकबाकीदारांनी देखील येणे असलेली थकबाकी न भरल्याने त्यां चे 8 ते 10 नळसंकूलन बंद करण्याेत आले असून नगरपरिषदेने ज्याक कोणा थकबाकीदाराकडे रक्करम येणे असेल त्यांेनी त्व रीत भरणे बाबत आवाहन केले असून थकबाकी न भरलेस नळ संकूलन तात्काॉळ बंद करण्या त येऊन मालमत्ता जप्तीची कार्यवाही करणार असले बाबत कळविले आहे. त्याच प्रमाणे शहरातील जागाभाडे / गाळाभाडे थकबाकी धारकांनी देखील त्यांचेकडेस येणे असलेली बाकी त्वरीत भरावी अन्यथा त्यांचा गाळा सिल करण्याची देखील कार्यवाही करण्यात येऊन दिनांक 1 मार्च 2023 नंतर दरमहा 2% प्रमाणे अथवा वार्षिक 24% या प्रमाणे व्याजदर आकारणी करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
सदर धडक मोहीमेत मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख दत्तात्रय गोविंदा जाधव यांच्या पथकात राजेंद्र शिंपी, भिकन गायकवाड, विशाल मराठे, शाम अहिरे, विलास कुलकर्णी आदी कर्मचा-यांचा समावेश आहे. पाचोरा शहराच्याा विकासासाठी नागरीकांनी थकीत करांचा भरणा करण्याकबाबत तसेच कटू प्रसंग टाळण्यासचे आवाहन मुख्यााधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर यांनी केले आहे.

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

बातमी लाईक  करा,शेअर करा

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!