डॉ एपीजे अब्दुल कलाम सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल मिशन 2023″ – भारतीय विद्यार्थ्यांनी केला जागतिक बुक ऑफ रेकॉर्ड.

पट्टीपुलंम(तामिळनाडू ) – महाराष्ट्रातील ५३० विद्यार्थ्यांचा सहभाग या प्रकल्पात होता.एकूण 5000 विध्यार्थी सहभागी होते , त्यांचे प्रशिक्षण होऊन नंतर परीक्षा घेण्यात आली आणि 100 मुलं मेरिट मध्ये आली त्यात 100 मुलांमध्ये यशराज योगेंद्र गुढेकर पाचोरा याची 39 रँक आली.
डॉ एपीजे अब्दुल कलाम सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल मिशन 2023″ हे यांनी संयुक्तपणे आयोजित केले होते. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन, स्पेस झोन इंडिया आणि मार्टिन ग्रुप. देशभरातील इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतच्या ५००० विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) वर काम करण्यासाठी प्रेरित करणे आणि त्यांचे पर्यवेक्षण करणे आणि 150 PICO च्या डिझाइन आणि विकासासाठी त्यांना त्यांचे ज्ञान आणि कौशल्ये वापरण्यास सक्षम करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट होते. AKSLV रॉकेट (तांत्रिक प्रात्यक्षिक) द्वारे उपग्रह प्रक्षेपित केले गेले.
तेलंगणाचे माननीय राज्यपाल आणि पुद्दुचेरीचे माननीय लेफ्टनंट गव्हर्नर, डॉ (श्रीमती) तमिलिसाई सुंदरराजन, पुद्दुचेरी विधानसभेचे माननीय अध्यक्ष श्री. अण्णाम्मी एम्बलम, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सॅटेलाइट लाँच व्हेईकल मिशन 2023 चे सॉफ्ट प्रक्षेपण. (पद्मश्री पुरस्कारप्राप्त) इस्रोचे डॉ. एपीजेएम. नाजेमा मरईकायर (AKIF), श्री. एपीजेएमजे शेख दाऊद (एकेआयएफ), श्री. APJMJ शेख सलीम (AKIF), डॉ आनंद मेगलिंगम (SZI), डॉ. Rtn. लीमा रोज मार्टिन (मार्टिन ग्रुप), डॉ. जोस चार्ल्स मार्टिन (मार्टिन ग्रुप), डॉ. सुलतान अहमद इस्माईल (तामिळनाडू सरकार), डॉ. बी. वेंकटरामन (आयजीसीएआर), श्री. T.N.C वेंकटरांगन (तांत्रिक सल्लागार – AKIF), डॉ. आर. राजेंद्रन (AWR) कामराजर मणिमंडपम, पुडुचेरी येथे. महाराष्ट्र मधील विद्यार्थ्यांनी कलाम सर यांची वेशभूषा करून राष्ट्रध्वजासह भारतीय सेनेच्या वेशातील महाराष्ट्रातील विद्यार्थी मंचावर उपस्तित होते.

तामिळनाडू येथील पट्टीपुलंम येथून यशस्वी रित्या भारतातील पाहिले हायब्रीड रॉकेट लाँच झाले. त्या सोबत विद्यार्थ्यांनी बनविलेले १५० उपग्रह अवकाशात यशस्वी पणे नेण्यात आलेत. हे उपग्रह अवकाशात नेण्यासाठी वापरलेले रॉकेट सुद्धा भारतीय बनावटीचे असून या रॉकेट मध्ये २ प्रकारचे इंधन वापरण्यात आले. या रॉकेट बाबत सर्व प्रशिक्षण सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. या मिशनचे वैशिष्ट्य असे कि संपूर्णपणे भारतीय विद्यार्थ्यांची हि मिशन होती. संपूर्ण जगात अशी स्टुडंट्स मिशन आजवर झालेली नसल्याने अर्थातच वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये सर्व विद्यार्थ्यांची नोंदणी झाली. या रॉकेट प्रक्षेपणावर नजर ठेवण्यासाठी प्रत्यक्ष इसरो चे माजी संचालक आणि लघु उपग्रह चे शासर्गन्य श्री. होते आणि उपस्थितांना मार्गदर्शन सुद्धा करीत होते.प्रक्षेपण ठिकाणी डॉ आनंद मॉलिगंम याना मार्गदर्शन करण्यासाठी इसरो चे वैगन्यानिक श्री गोकुळ प्रत्यक्ष हजर होते.
काउन्ट डाउन संपताच हे हायब्रीड रॉकेट १५० पिको उपग्रहासोबत अवकाशात झेपावले आणि लगेच सर्व उपग्रह आपापले कार्य करून जमिनीवर उभारलेल्या केंद्राशी संपर्क करून वातावरणातील विविध माहिती पाठवू लागलेत. ३७९ सेकंड नंतर रॉकेट मधील इंधन संपले आणि रिकेत ने १५० उपग्रह अवकाशांत सोडले. सर्व उपग्रह पॅराशूट चे साहाय्याने अवकाशातील सब ऑर्बिट मध्ये तरंगू लागलेत. त्याच वेळी रॉकेट चे आतील भागात असलेला पॅराशूट सुद्धा उघडला गेला आणि त्याचे साहायाने रॉकेट चा परतीचा प्रवास सुरु झाला.
प्रक्षेपण स्थळ पासून ६.५ कमी अंतरवर रॉकेट समुद्रात उतरले . जि पी एस सिस्टिम चे साहाय्याने रॉकेट कुठे उतरलेय याची माहिती मिळाली. या माहिती चे आधाराने कोस्टगार्डस चे मदतीने रॉकेट परत हस्तगत करण्यात आले.
या रॉकेट चा उपयोग परत पुढील मिशन साठी करता येईल.
अतिशय रोमांचित असलेल्या या मोहिमेत महाराष्ट्र मधील कानाकोपऱ्यातून विद्यार्थी पालक शिक्षक यांनी पट्टीपुलंम ला हजेरी लावली. अवकाश संशोधन संबधी विद्यार्थ्यांना चालना देणारी हि मोहीम डॉ आनंद मॉलिगंम या २९ वर्षे वयाचे तरुण वैगण्यानिकाचे संचलनात पार पडली
डॉ एपीजे अब्दुल कलाम सॅटेलाइट लाँच व्हेईकल मिशन २०२३ मध्ये सहभागी होण्यासाठी ५,००० उमेदवारांमधून
संपूर्ण महाराष्ट्रातून ५३० विद्यार्थ्यांचा या मोहिमेत सहभाग होता हे अभिमास्पद आहे. या विद्यार्थ्यांना aadhi १० दिवसांचे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले होते. श्री मोहित चौधरी यांनी मराठी हिंदी इंग्रजी भाषेतून त्यांनी सादर प्रशिक्षण दिले. त्या नंतर महाराष्ट्रात पुणे परभणी आणि नागपूर येथे एक दिवसीय कार्यशाळा डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फौंडेशन तर्फे आयोजित करण्यात आली होती.
मुलांनी 150 पिको उपग्रहांचे डिझाईन आणि विकसित केले होते. मार्टिन फाउंडेशन, तामिळनाडू, डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन आणि स्पेस झोन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने मोहीम पार पडली. श्री मिलिंद चौधरी ( सचिव एके आय एफ ) मनीषा ताई चौधरी ( राज्य समन्वयक) यांचे सदर बाबत मनस्वी आभार.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



