आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र
Trending

संत नरहरी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव उत्साहात संपन्न ; एनपीए-थकबाकी शून्य, सभासदांना गिफ्ट व मान्यवरांचा सत्कार

पतसंस्थांनी सभासदांच्या ठेवीचे व हिताचे रक्षण करावे, कर्जवाटपात कठोरता आवश्यक – आमदार किशोर पाटील 

पाचोरा – पतसंस्थांनी सभासदांच्या ठेवीचे व हिताचे रक्षण करणे हेच संस्थेचे मुख्य ध्येय असले पाहिजे. तसेच कर्जवाटप करताना चेअरमन व संचालक मंडळ कठोर असले पाहिजे, जेणेकरून चुकीच्या लोकांना कर्ज दिले जाणार नाही व वसुलीची अडचण येणार नाही, असे प्रतिपादन पाचोरा-भडगाव विधानसभेचे आमदार किशोर पाटील यांनी केले.ते संत नरहरी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त सुवर्ण अहिर मंगल कार्यालयात आयोजित समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार किशोर पाटील होते. संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त सर्व समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या.

आमदार पाटील पुढे म्हणाले की, सहकाराकडून समृद्धीकडे जात असताना अलीकडे सहकार क्षेत्र उद्ध्वस्त होत आहे. अशा परिस्थितीत संत नरहरी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेने उल्लेखनीय कार्य केले आहे. या पतसंस्थेचा एनपीए शून्य आहे, थकबाकी शून्य आहे व नफा चांगल्या प्रमाणात आहे, म्हणून ही पतसंस्था व संचालक मंडळ कौतुकास पात्र आहे. कर्ज वाटपाबाबत मार्गदर्शन करताना आमदार म्हणाले, “कागदपत्रांची पूर्ण पूर्तता केल्याशिवाय कर्ज देऊ नये, हे ध्येय असायला हवे. जेणेकरून संस्था कर्ज बुडीत न होता प्रगतीपथावर राहील. अन्यथा कर्जवाटपात कचुराई झाल्यास ते वसूल न झाल्याने संस्था डबघाईस येऊ शकते. सहकारात एकमेकांना मदत करत काम केले पाहिजे.”

पतसंस्था चेअरमन बापू सोनार यांनी संस्थेची आर्थिक शिस्त अधोरेखित करताना सांगितले की, “आमची संस्था काटेकोर आर्थिक शिस्त पाळते. संचालक मंडळ वायफळ खर्च करीत नाही, त्यामुळेच संस्था आज चांगल्या स्थितीत आहे.”

पतसंस्थेचे संस्थापक सदस्य व माजी चेअरमन राजाराम सोनार यांनी खंत व्यक्त केली की, “निवडणूक होत असताना सगळ्यांना माहितीच नसते. नवीन संचालक निवडून आणायचे असल्यास त्याबाबत सर्वांना माहिती दिली पाहिजे.” यावर कार्यक्रमात हास्यकल्लोळ होऊन निवडणुका बिनविरोध होण्याचे जणू गुपित सार्वजनिक केले ? नंदू सोनार यांनीही आपले मनोगत व्यक्त करीत संस्थेने केलेली प्रगती हे सर्वाचे टीम वर्क असून आपापसात एकोपा आहे व सहकार्य असल्याने हा २५ वर्षाचा प्रवास यशस्वी पार करता आल्याचे सांगीतले

नवीन पिढीला सहकारात आणण्यासाठी  जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी सूचना केली की  जिल्हास्तरावरून कार्यक्रम राबवून सहकार क्षेत्रातील अद्ययावत माहिती नवयुवकांना दिली पाहिजे. त्यातून त्यांच्या अर्थार्जन व रोजगाराची सुरुवात कशी होऊ शकते, याबाबत त्यांना ज्ञान देऊन नवीन पिढीला सहकारात सामील करून घेतले पाहिजे. या बाबत जिल्हा निबंधक कार्यलय सहकार विभाग यांचे मार्फत लवकरच प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जाईल.पतसंस्थेचे कार्य जिल्ह्यात आदर्श असल्याचे सांगून आदर्श पतसंस्था पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवल्यास राज्य शासनाकडे पाठपुरावा करू, असेही आश्वासन दिले.

रौप्य महोत्सवानिमित्त संस्थेच्या सभासदांना गिफ्ट देण्यात आले. तसेच येथील माजी सर्व बँक व्यवस्थापक व लेखापाल यांचा सत्कार करण्यात आला. फाउंडर मेंबर यांचेही स्मरण करण्यात आले. संचालक नंदू सोनार व त्यांच्या अर्धांगिनी माजी महिला चेअरमन यांचाही सत्कार आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी सहकार भारती राष्ट्रीय मंत्री दिलीप पाटील, जिल्हाध्यक्ष शशिकांत साळुंखे, सीए आर. डी. जैन, सहनिबंधक महेश कासार यांनीही आपल्या मनोगतातुन पतसंस्थेच्या कार्याचा गौरव केला.

व्यासपीठावर आमदार किशोर पाटील, जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने, दिलीप पाटील, शशिकांत साळुंखे, चेअरमन विष्णू सोनार, व्हॉइस चेअरमन सुरेश देवरे, सहनिबंधक महेश कासार आदी उपस्थित होते. प्रास्ताविक अध्यक्ष बापू सोनार यांनी केले. सूत्रसंचालन जेष्ठ पत्रकार सी. एन. चौधरी , पत्रकार संदीप महाजन यांनी केले तर आभार राजेंद्र बाळदकर यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी मॅनेजर श्रीपाल गौड,कॅशियर विवेक कानडे ,शिपाई जितेंद्र पाटील यांनी अथक परिश्रम घेतले

मॅनेजर श्रीपाल गौड,, कॅशियार विवेक कानडे ,शिपाई जितेंद्र पाटील

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

बातमी लाईक  करा,शेअर करा

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!