आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र

शिंदे इंटरनॅशनल स्कूल चे बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 100%, परंपरा कायम.

पाचोरा : सन 2025–26 मध्ये घेण्यात आलेल्या CBSE बोर्डाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. पाचोरा येथील शिंदे इंटरनॅशनल स्कूलने सलग सातव्या वर्षी 100% निकालाची परंपरा कायम ठेवत संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विद्यार्थ्यांच्या घवघवीत यशामुळे शाळेच्या यशोगाथेत आणखी एक सुवर्णपान जोडले गेले आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे, उपाध्यक्ष नीरज मुणोत, सेक्रेटरी ॲड. जे.डी. काटकर, सहसचिव डॉ.शिवाजी शिंदे, संचालक अमोलभाऊ शिंदे, सौ. पूजाताई शिंदे तसेच शाळेचे प्राचार्य डॉ. विजय पाटील यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश त्यांच्या अथक परिश्रमांचे फलित असून, शाळेतील अनुभवी व समर्पित शिक्षक वृंदांच्या मोलाच्या मार्गदर्शनाचीही त्याला जोड लाभली आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, योग्य दिशा आणि प्रेरणादायी वातावरण उपलब्ध करून देण्यात शाळेने नेहमीच अग्रणी भूमिका बजावली आहे.
शाळेच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, शिंदे इंटरनॅशनल स्कूलने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची ठळक छाप उमटवली आहे.

या निकालामध्ये पुढील विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवत शाळेचा गौरव वाढविला आहे:
कुणाल किशोर पाटील – 93% (प्रथम)
देवेश अभिमान पाटील – 92.2% (द्वितीय)
जागृती विनोद तावडे – 89.4% (तृतीय)
स्वराली राहुल पाटील – 88.8%
सिद्धार्थ प्रताप पाटील – 88.4%
आरुषी उमेश शामनानी – 87.8%
विस्मय प्रकाश सुराणा – 86.8%
गुंजन प्रकाश दुलानी – 84.6%
खुशी हसनंद पंजाबी – 84.2%
धैर्यशील रामेश्वर पाटील – 84%

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

बातमी लाईक  करा,शेअर करा

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!