
पाचोरा – बाळद.बु मधील तलाठी अतुल पाटील यांच्या नावाने अनेक सामाजिक कार्यकर्ते आरटीआय कार्यकर्ते व वाहतूकदार यांनी माननीय तहसीलदार पाचोरा येथे तक्रारी दाखल केलेल्या आहेत सदर तलाठी हे त्यांची सजा बाळद येथे कामावर असताना देखील पाचोरा शहर व आजू बाजूच्या परिसरात रात्री गस्तीवर फिरून वाळू वाहतूकदार यांना अडवुन आर्थिक लुबाडणूकीच्या हेतूने त्रास देऊन पैसे मागत असतात असे आरोप होत आहे हे वरिष्ठांच्या मर्जीनेच मलिदा मिल बाटकर खायेंगे या युक्तीने सदर तलाठी पाचोरा तालुक्यात काम करत असल्याचे बोलले जाते.यांचे अनेक प्रकार बाळद येथील ग्रामस्थांनी कथन केलेले आहे तसेच अनेकांनी आरटीआय अंतर्गत माहिती मिळविलेले आहे व अर्जही प्रलंबित आहेत सदर तलाठी यांची मोडस ऑफ ऑपरेडी ही मारा झोडा आणि राज्य करा अशीच दिसून येत आहे.
बाळद मधील 2025-26 सालचे अतिवृष्टी मुळे नाल्या काठच्या विहिरी धसल्या गेल्याने याच गोष्टीचा फायदा घेत सदर तलाठी यांनी संबंधित व्यक्तींना अनुदान प्राप्त करून देण्यासाठी खोटे पंचनामे केले असल्याचा आरोप होत आहे तसेच त्यावर पोलीस पाटील,ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी व पंचांच्या सह्या असून अनेक व्यक्तींना याचा लाभ मिळाला असल्याचे सूत्रांकडून कळते.अतिवृष्टी मुळेही साल 2025-26 मधील घरांचे पंचनामे करून शासन दरबारी पाठवणे गरजेचे होते यांनी घर नसलेल्यांचे दुसऱ्या घरांचे पडलेले असल्याचे फोटो दाखवून खोटा पंचनामा शासनास सादर केल्याचे समजते.तसेच घर नसलेल्या व्यक्तीला सुद्धा यांनी चाळीस हजार रुपये पर्यंतची रक्कम मिळवून दिले आहे अशी दबक्या आवजे चर्चा पंचक्रोशीत आहे तसेच काहींचे घरे घरकुल लाभार्थी असल्यावर देखील घर पडल्याचा खोटा पंचनामा केला,आपल्या सोबत इतरांनाही सह्या घेऊन अडकवणे व गावातील ठराविक त्याच त्याच लोकांना नेहमीप्रमाणे लाभ धारक बनवण्याचे षडयंत्र तक्रारदारांनी उघडकीस आणलेले आहे.गोर गरिबांना शासकीय योजनांचा लाभ होत नाही पण काही निवडक यांचे कामे लवकर होतात असेही आरोप आहेत शिवाय यांचे विरूद्ध तक्रार दाखल असता बचावात्मक पवित्र घेत यांची बाजू घेणेसाठी म्हणून तलाठी यांनी तक्रार करणाऱ्यांच्या तक्रारीला विरोध म्हणून गावातील मर्जीतील लोकांना निवेदन देण्यासाठी पाठवले,तलाठी खूप चांगले आहे.लोकांना शासकीय लाभ मिळवून देणार आहेत,वेळेवर लाभ मिळवून देणारेअसून कार्य प्रणाली चांगली आहे असे. परंतु तरी निवेदन देणाऱ्यांची ही सविस्तर चौकशी झाली पाहिजे व दूध कां दुध पाणी का पाणी झाले पाहिजे.अशी भवना येथील जनतेची आहे
आई-वडिलांच्या मृत्यूनंतर एकत्रित कुटुंबाला शेती अनुदानाची रक्कम न देता इतरांना वंचित ठेवून सदर तलाठी यांनी यांनी आर्थिक देवाण-घेवाण करणाऱ्यांना वैयक्तिक खात्यावर टाकून दिलेले आहे असे कळते ही शासनाची व त्या घरातील इतर सदस्यांची फसवणूक आहे.
सदर तलाठी यांच्यावर तितूर नदीकाठ बाळद परिसरातील वाळू हे पोकलेने उपसा करून ती भडगाव व पाचोरा तालुक्यातील परिसरात वितरित केले जात असल्याचे आरोप असून हे रात्रं दिवस त्याच कामात व्यस्त असल्याचे तेथील नागरिक कळवतात त्यामुळे अशा व्यक्तीचे कॉल डिटेल्स चेक करून लोकेशन चेक करून सदर व्यक्तीच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी होऊन कारवाई करण्याची मागणी पंचक्रोशीतील नागरिकांनी केलेली आहे.
पाचोरा शहरातून देखिल नगर सेवक संदीप पाटील यांची तक्रार महसूल कार्यालयात दाखल आहे.


तरी त्यावर काय कारवाई होते या कडे लक्ष लागून आहे शिवाय यांना कुणी पाठीशी घातले तर लवकरच त्यांची सर्व प्रकारची चौकशी व तक्रार दाखल होईल याची जाणीव आता वरिष्ठानां आली पाहिजे.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



