
पाचोरा : – येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाचोरा येथे शिवसेनेच्या वतीने भव्य मेळावा व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आ. किशोरआप्पा पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा हा सत्कार आयोजित करण्यात आला होता.
पाचोऱ्यातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते , चाहते या भव्य मेळावा व सत्कार समारंभा प्रसंगी हजर होते. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका,व पक्ष संघटन मजबुत करणे , कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण, निवडणुकीत यश संपादन करणे आदी संदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही व भविष्यातील निवडणुका बाबत मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात अमरावती लोकसभा संपर्क प्रमुखपदी पाचोरा भडगावचे आमदार किशोर पाटील यांची नियुक्ती झाल्याने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला शिवाय त्यांची ही यशस्वी वाटचाल पुढे अशीच सुरू राहण्यासाठी सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी सत्कार रुपी शुभेच्छा देत आपला पाठिंबा दर्शविला .
शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार सदर पद आ. किशोर पाटील यांना मिळाले असून ते नक्कीच या जबाबदारीला यशस्वी पणे हाताळतील यात काही शंका नाही या सत्कार मेळावा आणि आगामी निवडणुकीचे पार्श्वभूमीव आयोजित कार्यक्रमास प्रचंड प्रतिसाद लाभला पाचोरा व भडगाव तालुक्यातील शिवसेना, युवासेना पदाधिकारी, महिला आघाडी, विविध संघटना, शाखाप्रमुख, बूथप्रमुख आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या मेळाव्यास उपस्थिती नोंदविली.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



