आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र
Trending

दप्तर दिरंगाई टाळावी, गतिमान प्रशासन चालावे करीता मंडळाधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांना 21 लॅपटॉप व 61 प्रिंटर चे वाटप.

पाचोरा – आज दि.2 एप्रिल 2026 रोजी तहसील कार्यालय पाचोरा येथे पाचोरा तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी व ग्राम अधिकारी यांना लॅपटॉप व प्रिंटर वाटप करणे बाबत कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता यावेळी पाचोरा/भडगाव विधानसभेचे सदस्य मा. आमदार श्री. किशोर आप्पा पाटील, मा उपविभागीय अधिकारी श्री. भूषण अहिरे , तहसीलदार श्री विजय बनसोडे, निवासी नायब तहसीलदार श्री विनोद कुमावत व नायब तहसीलदार महसूल श्री प्रमोद मोरे हे उपस्थित होते तसेच मा आमदार श्री. किशोर आप्पा पाटील व मा उपविभागीय अधिकारी श्री भूषण अहिरे यांच्या हस्ते सर्व मंडळाधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांना 21 लॅपटॉप व 61 प्रिंटर चे वाटप करण्यात आले.

सदरील कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन नायब तहसीलदार श्री विनोद कुमावत यांनी केले तसेच मा आमदार श्री किशोर आप्पा पाटील व मा उपविभागीय अधिकारी श्री भूषण अहिरे तसेच तहसीलदार पाचोरा श्री विजय बनसोडे यांनी उपस्थित सर्व मंडळाधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांना यावेळी मार्गदर्शन केले तसेच सर्व मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांच्यातर्फे निवासी नायब तहसीलदार श्री विनोद कुमावत यांनी पाचोरा तालुक्यासाठी लॅपटॉप व प्रिंटर मिळवून दिल्याबद्दल मा आमदार श्री किशोर अप्पा पाटील यांचे आभार व्यक्त केले.

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

बातमी लाईक  करा,शेअर करा

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!