पंचायत समिती पाचोरा मधील दहा जि प शिक्षकांचे समायोजन

पाचोरा – येथील पंचायत समिती पाचोरा अंतर्गत जिल्हा परिषदेच्या एकूण दीडशे जिल्हा परिषद शाळा असून संचमान्यतेनुसार एक मुख्याध्यापक, एक पदवीधर, आठ उपशिक्षक अतिरिक्त ठरले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल व शिक्षणाधिकारी प्राथ. निलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि 1 एप्रिल 26 रोजी गट विकास अधिकारी सुधाकर मुंढे, गट शिक्षणाधिकारी विजय पवार यांनी सदर अतिरिक्त शिक्षकांचे रिक्त जागावर समायोजनाने बदली करण्याची प्रक्रिया पारदर्शकपणे राबवली.
सदर कामी शिक्षण विस्तार अधिकारी समाधान पाटील, सरोज गायकवाड, कार्यालय अधीक्षक अमोल पाटील, लिपिक सतीश पाटील, संजय पाटील, सुनील शिवदे, घनशाम चौधरी, सर्व केंद्र प्रमुख यांनी सहकार्य केले.यावेळी शिक्षक संघटना प्रतिनिधिंनी समायोजन प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडल्याबद्दल पंचायत समिती अधिकारी वर्गाचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. जिल्हा परिषद शिक्षकांनी पटसंख्या वाढीसाठी वाढीव प्रयत्न करण्याचे व जि प शाळा टिकवण्याचे आवाहन गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी याप्रसंगी केले.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



