आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
आपला जिल्हाशेती विषयक (FARMING)

लोहारा येथील तलाठी यांचा भोंगळ कारभार जिवंत शेतकऱ्याला मयत दाखवून प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजने पासून ठेवले वंचित ?

कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करून निलंबित करण्याची शेतकऱ्याची मागणी

पाचोरा : लोहारा ता पाचोरा येथील शेतकरी अशोक भगवान चौधरी गट नंबर ९२३ क्षेत्र ०,३२ आर शिवार लोहारा येथील शेत जमिनीवर शेतकरी अशोक भगवान चौधरी यांनी शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत ऑनलाइन रीतसर दिनांक २०/०२/२०१९ रोजी फार्म भरलेला होता त्यानंतर मला ०३/०९/२०२० पहिला हप्ता रक्कम रुपये 2000 मिळाले व नंतर एकही हप्ता मला मिळाला नाही त्यावेळेस बरेच दिवस मी तलाठी कार्यालयाचे उंबरठे गाठले मात्र तलाठी लोहारा नदीम शेख हे सतत मला तुमचे पैसे आज येईल उद्या येईल असे सांगून वेळ मारून देत होते व व्यवस्थित न बोलता मला तेथून हाकलून लावत असे. काही दिवस गेल्यानंतर मी दिनांक २०/०५/२०२१ रोजी माझ्या मुलाकडून  ऑनलाईन तपासले असता तलाठी लोहारा नदीम शेख यांनी मला मयत दाखवले आहे व तसा पी एम किसान पोर्टलवर रिमार्क करून मला कायमस्वरूपी शासनाच्या योजनेपासून वंचित ठेवले व ठेवत आहे याचा जाब विचारण्यासाठी मी त्याच दिवशी दिनांक २०/०५/२०२१ रोजी त्यांच्याकडे आधार कार्ड व बँक पासबुक घेऊन गेलो असता त्यावेळेस त्यांनी मला व्यवस्थित उत्तरे न देता मला अरे कारे भाषा वापरात तुम्ही मला एक हजार रुपये दिले होते का पैसे द्या तुमचे काम लगेच मी करून देतो असे म्हणत तेथून मला   कार्यालयाबाहेर काढले जा इथून पुन्हा येऊ नकोस तू पाचोरा तहसिलदार कडे जा तिथे तुला पैसे मिळतील मी काही तुझा नोकर नाही फुकट काम करायला असे माझ्यासोबत त्यांनी अशोभनीय कृत्य केले सदरील प्रकारामुळे मी पूर्णपणे भयभीत झालो मी जिवंत असताना त्यांनी मला मयत का दाखवले हा विचार करत मी तिथून निघून आलो नंतर मी माननीय तहसीलदार साहेब पाचोरा यांच्याकडे दिनांक २६/०५/२०२१ व मा जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे दिनांक २८/०५/२०२१ रोजी लेखी तक्रार अर्ज दिलेत मात्र आज पर्यंत माझ्या अर्जावर कोणत्याही प्रकारे कार्यवाही झालेली नाही मागील काही महिन्यापूर्वी असेच प्रकरण मौजे  कळमसरा येथील शेतकरी संतोष बोकारे यांना देखील तलाठी नदीम शेख यांनी मयत दाखवून लाभापासून वंचित ठेवले होते अशी आपबीती शेतकरी श्री अशोक भगवान चौधरी यांनी बोलताना सांगितले लोहारा ता पाचोरा येथील तलाठी नदीम शेख यांच्याबाबत अनेक गावातील शेतकरी नागरिक यांचे अर्ज वरिष्ठ पातळीवर पेंडिंग आहेत मात्र आज पाहतो रीतसर तलाठी शेख यांच्यावर माननीय तहसीलदार साहेब जिल्हाधिकारी साहेब का कारवाई करत नाही हा प्रश्न गावातील नागरिकांना व शेतकर्‍यांना पडलेला आहे तरी अशोक भगवान चौधरी या अत्यंत गरीब शेतकऱ्याला लवकर न्याय मिळावा अन्यथा शेतकरी माननीय तहसीलदार साहेब पाचोरा यांच्यासमोर उपोषणास बसण्यास तयार असल्याचे त्यांनी बोलून दाखवले या प्रकारामुळे गावातील लोकांमध्ये चर्चेला उधान आले आहे अशोक भगवान चौधरी हे तर जीवित आहेत तलाठी यांनी मयत दाखवले कसे व का ? हे कोडं उलगडणं गरजेचे आहे.

शेतकरी अशोक भगवान चौधरी यांचे तक्रार अर्ज

.

.

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377

.

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: CALL ME 8411009377 \\\\