मंत्री ना.जयंत पाटील यांना पूरग्रस्त भागातील नुकसान भरपाईसह विविध मागन्यांचे मा.आ.दिलीपभाऊ वाघ यांनी दिले निवेदन

चाळीसगाव,दि.4- तालुक्यातील झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे चाळीसगाव तालुक्यातील तालुक्यातील पूरग्रस्त भागातील गावात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय नामदार जयंत पाटील साहेब आले असता भडगाव पाचोरा मतदार संघातील गावात तितुर नदीमुळे नदीकाठच्या गावात जवळपास पाचशे हेक्टर च्या वर जमीन वाहून गेली असून, नगरदेवळा पूल दोन्ही बाजूचा भराव,कजगाव येथील केटी बंधाऱ्या च्या दोघं बाजूस भराव वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी व बंधाऱ्याचे काम करण्यासाठी आणि कजगाव गावास नदीकाठी संरक्षण भिंत बांधण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी याबाबतचे निवेदन भडगाव पाचोरा मतदार संघाचे माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्या उपस्थित विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन दादा तावडे,तालुकाध्यक्ष राहुल पाटील, कार्याध्यक्ष हर्षल पाटील, युवक तालुकाध्यक्ष स्वप्नील पाटील, गोपी पाटील आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत देण्यात आले असून त्यावर तात्काळ कार्यवाहीच्या सूचना माननीय मंत्री महोदयांनी संबंधित विभागास दिल्या

.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



