प्रत्येक महाविद्यालयात कोविड-19 लसीकरण केंद्र कार्यान्वित करावे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. संतोष चव्हाण
जळगाव, दि.26 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्या सहकार्याने प्रत्येक महाविद्यालयात लसीकरण केंद्र कार्यान्वित करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. संतोष चव्हाण यांनी दिले आहेत.
उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे ‘मिशन युवा स्वास्थ्य कोविड-19’ हे अभियान राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर, 2021 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. त्यानुसार उच्च शिक्षण विभागातर्फे या अभियानाच्या यशस्वितेसाठी जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व प्राचार्य, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी तसेच विद्यार्थी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांची दूरदृश्य प्रणालीव्दारे बैठक आयोजित करीत लसीकरणासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत.
विद्यार्थ्यांचे लसीकरण करुन घेण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात लसीकरण केंद्र आरोग्य विभागाच्या सहकार्याने उभारावे. त्यासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाची मदत घ्यावी. महाविद्यालयात प्रवेशित बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागातील असल्याने त्यांना लस घेण्याचे सोयीचे होणार आहे. तसेच ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्कमध्ये अडचण येत असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करणे शक्य होत नाही, अशा विद्यार्थ्याना महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या लसीकरण केंद्रात आपली नोंद व लसीकरण करुन घेणे शक्य होणार आहे. शासनाच्या मिशन युवा स्वास्थ्य अभियानाच्या उदिष्ट पूर्तीसाठी महाविद्यालयांनी जनजागृती करीत एकही विद्यार्थी लस घेण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. त्यासाठी विद्यार्थ्यांशी मोबाईलद्वारे संपर्क साधून लसीकरणाबाबत जागृत करावे, असेही सहसंचालक डॉ. चव्हाण यांनी म्हटले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377