
पारोळा- दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी एरंडोल पारोळाचे आमदार आबासाहेब चिमणराव रूपचंद पाटील यांची मुलाखत जवाहर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय गिरड येथील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी घेतली यात एकूण 22 विद्यार्थ्यांचा समावेश असून आबासो चिमणराव पाटील यांच्या पारोळा येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी विविध सामाजिक राजकीय व शैक्षणिक विषयांवर प्रश्नोत्तरे घेऊन यात आमदार साहेबांनी विचारलेल्या प्रश्नांना मनसोक्त उत्तर दिले तसेच माझ्या जीवनात मी अनेक मुलाखती दिल्या परंतु विद्यार्थ्यांनी घेतलेली ही माझी पहिलीच मुलाखत आहे व त्यांच्या विचारलेल्या प्रश्नावरून त्यांच्या बौद्धिक क्षमतेचा लौकिक व कौतुक केले यादरम्यान आमदारानी शाळेसाठी व संस्थेसाठी आपल्या लेटर पॅड वर शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता दहावीची क्लास टीचर श्री एन एन पाटील सर यांनी विद्यालयाचे प्राचार्य आबासो बी वाय पाटील उपप्राचार्य नानासो पी जि सोनवणे पर्यवेक्षक एन यु देसले यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने व उप शिक्षक श्री प्रवीण मनोरे सर यांच्या सहकार्याने पार पडला
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



