पाचोरा – शहरातील औदुंबर नगरातील गेल्या काही दिवसांपासून अंधारात असलेल्या नागरिकांच्या मदतीला कॉंग्रेस अध्यक्ष धावुन आल्याने विज वितरण कंपनीवर चे हल्ला बोल आंदोलन मागणी मजुंर झाल्याने मागे घेण्यात आले
शहरातील जुन्या सारोळा बुद्रुक रस्त्यावर असलेल्या औदुंबर नगरातील रहीवाशी गेल्या दिड वर्षा पासुन इलेक्ट्रिक पोल साठी संघर्ष करत होते येथील रहिवाशांनी अनेक राजकीय सह सामाजिक पदाधिकारी यांच्या भेटी घेऊन समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले तरी देखील समस्या सोडविली गेली नाही
त्यातच विज वितरण कंपनीने स्थानिक नागरिकांनी इतरांना कडुन घेतलेला विज पुरवठा खंडित केल्याने हा परीसर अंधारात आला अशा वेळी स्थानिक रहिवासींनी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांना परीसरात बोलवुन समस्या त्वरित सोडवा अशी मागणी केली असता कॉंग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी परीसरातील महीला आणि पुरुष घेऊन विज वितरण कंपनीच्या मुख्यालयातच आंदोलन करण्याच्या इराद्यात गेल्या वर विज वितरण कंपनीचे उपविभागीय अधिकारी प्रमोद हेलोडे यांना नागरिकांच्या समस्या सांगितल्यावर त्यांनी तात्काळ सहाय्यक अभियंता मनोज मोरे यांना सदरच्या परीसरातील अंदाज पत्रक तयार करण्याच्या सूचना दिल्या विज वितरण कंपनीचे अधिकारी यांच्या माणुसकी आणि कॉंग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी यांची नागरिकां प्रति तळमळ बघता वृध्द महीलांनी भरभरून आशिर्वाद दिले आणि नागरीक कार्यालयातुन परत गेले यावेळी परीसरात विनोद सुर्यवंशी, जीवन मराठे, समाधान कोटकर, निंबा महाजन, रत्नाबाई परदेशी, वत्सला सुर्यवंशी, जिजाबाई पाटील, द्रुपदाबाई महाजन, संगिता पाटील,भुषण लोहार, अश्विनी लोहार, रेणुका लोहार जितेंद्र लोहार आदी उपस्थित होते.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377