ई.६वी व ७ वी च्या विद्यार्थ्याना नागरिकशास्त्र विषयातील ग्रामापंचायत व पंचायती राज या पाठाचे प्रत्यक्ष अध्यापन घेण्यासाठी आर्यन इंटरनेशनल स्कूल चे उपक्रमशील उपमुख्याध्यापक अविनाश जावळे सर यांनी आपल्या विद्यार्थ्याना थेट ग्रामापंचायत मध्ये नेवून ग्रामापंचायत मधील कामकाज व तेथील सर्व विकास कामाची माहिती ग्रामापंचायत सदस्य व सरपंच यांच्याकडून मिळवून दिली
यावेळी शेरी गावातील ग्रामापंचायत सदस्य व सरपंच कैलास पाटिल सर तसेच पालधी खुर्द गावातील ग्रामापंचायत सदस्य व सरपंच लक्ष्मी कोळी यांनी विद्यार्थ्याना ग्रामापंचायत व पंचायत राज याबदल योग्य मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यानी ग्रामापंचायत बदल अनेक प्रश्न विचारले यात प्रामुख्याने ग्रामापंचायत कधी व केव्हा पासुन सुरु झाली , का सुरु करण्यात आली, ग्रामापंचायत चे काम काय, सरपंच चे काम ,गावात ग्रामापंचायत च्या माध्यामातून आतापर्यंत करण्यात आलेली विकास कामे असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यानी ग्रामापंचायत मध्ये उपस्थित सरपंच व सदस्य यांना विचारले असता उपस्थित ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्नाचे व समस्याचे आपल्या मार्गदर्शना मधून निराकरण केले यावेळी शेरी येथील सरपंच पती कैलास पाटिल यांनी विद्यार्थ्याना प्रत्यक्ष गावातील विकास कामाच्या ठिकाणी घेवून जावून प्रत्यक्ष विकास कामें व त्याची संपूर्ण माहिती विद्यार्थ्याना दिली यावेळी विद्यार्थ्यानी ही विकास कामा बदल महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली , अविनाश जावळे यांच्या नाविण्यपूर्ण शेक्षणिक उपक्रमाचे कौतुक ग्रामापंचायत सदस्य व सरपंच यांनी केले व विद्यार्थ्याना पुढील भावी शेक्षणिक वाटचाली साठी शुभेच्छा दिल्यात यावेळी कैलास पाटिल, पवन मोरे, शरद कोळी, अतुल पाटिल, लक्ष्मी कोळी, महेश पाटिल, नंदू नाहूरकर, अविनाश जावळे उपस्थित होते
.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377