गुरुकुल इंटरनॅशनल पाचोरा येथे स्पर्धा परीक्षा ग्रंथालय व ई-लायब्ररी चे उद्घाटन
पाचोरा येथील गुरुकुल इंटरनॅशनल येथे पाचोरा भडगाव चे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते 30 एप्रिल रोजी स्पर्धा परीक्षा ग्रंथालय व ई लायब्ररी चा उद्घाटन सोहळा पार पडला .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. राजेंद्र चिंचोले होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पाचोऱ्याचे गटशिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी, विनोद ललवाणी ,सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील ,प्रकाशलाल शामनानी ,नगरसेवक रामभाऊ केसवानी, बापूराव हटकर ,हरीभाऊ पाटील डॉ.मनिष चंदनानी, जगदीश गरुड ,निळकंठ पाटील, भारतीय सिंधू सभा चे सर्व सदस्य,चंद्रकांत मोराणकर हे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य प्रेमकुमार शामनानी यांनी केले.
गुरुकुल शाळेतील विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच स्पर्धापरीक्षांची आवड निर्माण व्हावी म्हणून प्राचार्य प्रेमकुमार शामनानी यांनी विद्यार्थ्यांना एमपीएससी, यूपीएससी ,रेल्वे ,स्टाफ सिलेक्शन कमिशन यासारख्या विविध स्पर्धा परीक्षांची पुस्तके व ई लायब्ररी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार किशोर आप्पा पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले .स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी यश प्राप्त करून शाळेचे व परिसराचे नाव उज्वल करावे अशा प्रकारच्या शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय भाषणात प्रा.राजेंद्र चिंचोले यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी शालेय जीवनापासून कशी करावी याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली .कोणत्याहो क्षेत्रात करिअर करताना आपली क्षमता व आवड ओळखून यशाचे शिखर गाठा अशाप्रकारच्या शुभेच्छा प्रा. राजेंद्र चिंचोले यांनी दिल्या
प्रमुख अतिथी गटशिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी यांनी गुरुकुल शाळा राबवित असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले .सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील यांनी नीतिमूल्यांच जीवनातील महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना वाणी मॅडम व शामनानी मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन आमेना बोहरा मॅडम यांनी केले कार्यक्रमास पालक ,शिक्षक व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निखिल शामनानी, अंकुश शामनानी , दुर्गेश शेलार व सर्व शिक्षक बंधूंनी सहकार्य केले
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377