आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
आपला जिल्हा
Trending

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने मानवंदना देऊन पाचोऱ्यात महाराष्ट्र दिन साजरा

पाचोरा दि.2–येथे हुतात्मा स्मारकात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील हौतात्म्य पत्करलेल्या 107 हुतात्म्यांचे स्मरण व त्यांना वंदन करण्यासाठी पाचोरा येथील शिवसेना, युवा सेना यांच्या वतीने सुधीर पाटील उर्फ गजू भाऊ यांच्या आगळ्यावेगळ्या संकल्पनेतून महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला .शैलेश कुलकर्णी यांनी 15फूट ×10फूट महाराष्ट्राच्या नकाशाची भव्य प्रतिकृती रांगोळीच्या सहाय्याने साकारली होती .नकाशाच्या कडेने 107हुतात्म्यांच्या नावाने प्रत्येकी एक दिवा कोरोना योद्धा असलेले डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी ,शिक्षक ,पोलीस अधिकारी ,कर्मचारी यांच्याकडून प्रजल्वित करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा भडगावचे आमदार किशोर आप्पा पाटील हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रांताधिकारी विक्रम बांदल,तहसीलदार कैलास चावडे, पोलीस निरीक्षक नजन पाटील ,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. राजेंद्र चिंचोले डॉक्टर असोसियनचे अध्यक्ष डॉ.दिनेश सोनार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ ,डॉक्टर अनिल झवर, मुकुंद बिल्दीकर ,डॉ. भरत पाटील हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र भीमराव पाटील यांनी केले अध्यक्षीय मनोगतात किशोर आप्पा पाटील यांनी महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरा व कोरोनायोद्धांचे कोरोना काळातील योगदान याबद्दल गौरवोद्गार काढले .यावेळी डॉ. दिनेश सोनार व तहसीलदार कैलास चावडे यांनी मनोगत व्यक्त केले. देशभक्तीपर गीतांमुळे चैतन्यदायी वातावरणाची निर्मिती झाली होती.
गजु भाऊ पाटील यांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नाना वाघ तर आभार प्रदर्शन गजू पाटील यांनी केले. कार्यक्रमास डॉ स्वप्नील पाटील ,डॉ. निळकंठ पाटील ,डॉ .पवन पाटील, डॉ .विशाल पाटील, डॉ .सुनील गवळी, डॉ .नंदकिशोर पिंगळे डॉ .अतुल पाटील डॉ .कुणाल पाटील, डॉ .मुकेश तेली, डॉ .अजय परदेशी, डॉ.गोरख महाजन, डॉ.दशरथ वाणी, विकास पाटील ,नरेंद्र पाटील ,डॉ.हर्षल देव ,डॉ.संजय चौधरी ,डॉ.दीपक चौधरी व पाचोरा शहरातील डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, शिक्षक वृंद, पोलीस कर्मचारी, शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किशोर बारावकर, बंडू चौधरी, राजू सूर्यवंशी, जितेंद्र जैन ,सुमित पाटील, जितेंद्र पेंढारकर ,वैभव पाटील ,वैभव राजपूत ,अनिकेत सूर्यवंशी, मोहित राजपूत, मनोज पाटील ,योगेश पाथरवट संदीप पाटील यांनी परिश्रम घेतले.

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!