माणुसकी समुहाने व जामनेर पोलीस स्टेशन यांनी दिला मनोरुग्ण महिलेला न्याय.

मानवसेवा तिर्थ वेले,चोपडा येथे केले दाखल.
जामनेर — सदरील मनोरुग्ण महिला पळासखेडा बुद्रुक जामनेर परीसरात गेल्या दोन-तीन महिन्यापासून पळासखेडे गावात व बस स्टँड परिसरात रात्री अपरात्री जोरजोरात आरोळ्या मारणे,नेहमी बडबडत असणे, ती मनोरुग्ण असल्याने मुलं तिची टिंगल ही करत.या बाबतची माहिती पळसखेड माणुसकी समूहाचे सदस्य योगेश वराडे यांनी सदर महिलेस मदत करण्यासाठी माणुसकी ग्रुप वर व्हाट्सअप मेसेज केला.व जळगाव माणुसकी समूहाचे समाजसेवक गजानन क्षीरसागर यांना सदरील मनोरुग्ण महिलेची माहिती दिली.
गजानन क्षीरसागर,चंद्रकांत गीते यांनी तात्काळ रात्री पळासखेडा बुद्रुक घटनास्थळी धाव घेऊन शोधमोहीम चालु केली असता,एक महिला बस स्टँड परिसरात झोपलेली आढळून आली चौकशी केली असता ती काहीतरी बडबडत होती प्रश्न प्रश्नांना व्यवस्थित उत्तर देत नव्हती, परंतु गावातील व्यक्तींनी सांगितल्याप्रमाणे ती इथेच राहत आहे व आम्ही गावातील व्यक्ती तिला खाण्यासाठी देत आहोत, परंतु ती काही दिवसापूर्वी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आम्हाला दिसली आम्ही काही गावातील महिलांच्या मदतीने तिला नवीन कपडे दिले व तुम्हाला कॉल केला असे त्यांनी सांगितले,गावातील पोलीस पाटील यांना बोलावून तात्काळ नंतर जामनेर पोलीस स्टेशन शी संपर्क साधला.या मनोरुग्ण महिलेला खाजगी वाहनांनी मानवसेवा तिर्थ वेले,चोपडा नरेंद्र पाटील यांच्या येथे अन्न वस्त्र निवारा याकरीता दाखल करन्यात आले.यावेळी समाजसेवक गजानन क्षीरसागर ,योगेश वराडे (जळगाव पोलीस),चंद्रकांत गीते (CRPF), कैलास पाटील,जामनेर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र ठाकरे, होमगार्ड सुरज चौधरी, उमेश बुंदले,मनीषा धमाण,पळासखेडा बू गावकरी, माणुसकी समूहाच्या टीमने मदत कार्य केले.
आतापर्यंत माणुसकी टिम ने कितीतरी मनोरुग्ण महिलेला न्याय दिला आहे.
माणुसकी समूह आता सामाजिक दायित्व साठी आणि सामाजिक कर्तव्य स्वीकारण्यासाठी एक समानार्थी शब्द बनलेला आहे.ती भगिनी मानसिक आजाराने पीडित आहेत.हा तीचा गुन्हा आहे का ? समाजाने वाळीत टाकलेल्या ह्या महिलांवर शारीरिक अत्याचार होत नसतील का ? अमानुष लोकांच्या वासनेच्या शिकार झालेल्या ह्या महिलांपासून जन्माला आलेल्या अनाथ मुलांचा भार कोणी सांभाळावा? हे प्रश्न कायम समाजाला विचारल्या जात आहे,आणि कोणीही कायमस्वरूपी ह्यावर उत्तर द्यायला तयार नाही.मग यांच्यासाठी एक मायेचं आपुलकीचं घर आहे का ? यांना असच उकिरड्यावर ठेवायचे काय ? समाजाच दायित्व काहीच नाही का ? हे मनोरुग्ण देखील आधी सामान्य जीवन जगत होते. जीवनात संकट सांगुन येत नसतात.पण ज्या सामाजिक संस्था अशा मनोरुग्णांसाठी काम करतात त्यांना मदत करण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी उद्योजकांनी समाजबांधवांनी समोर येणे अत्यंत गरजेचे ठरते.या मदतीतून आपण या मनोरुग्णांचे जीवन अधिक सुसह्य करू शकतो.आणि समाजाची खरी मानसिक विकृती नष्ट होईल.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



