गट, गण प्रभाग रचनांचे काम सुरु

जळगाव: दि. 27 : जिल्हा परिषद व त्या अंतर्गत पंचायत समित्यांच्या प्रभागाच्या भौगोलिक सिमा निश्चित करण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रान्वये जाहीर करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमानुसार जि.प.पं.स.सार्वत्रिक निवडणुकीसाठी गट व गण यांची प्रभागरचना करण्याचे कामकाज ग्रामपंचायत शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय येथून करण्यात येत आहे. सदर प्रभाग रचना करण्याचे कामकाज सुरु आहे. काही स्थानिक दैनिकांमध्ये सदर प्रभाग रचनेबाबत आलेल्या चुकीच्या बातमीमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे आढळून आलेले आहे.
तरी जि.प.पं.स.प्रभाग रचनेची अंतिम प्रसिद्धी जाहिर झालेली नसल्याचे सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



