सत्यवान महाजन यांचा सेवापुर्ती निमित्त गौरव
पाचोरा- वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा गाळण बु ता. पाचोरा येथे प्राचार्य पदावर कार्यरत असलेले श्री सत्यवान शामराव महाजन हे दिनांक 31मे रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा मान्यवरांच्या हस्ते नुकताच सेवापूर्ती गौरव करण्यात आला.
याबाबत अधिक वृत्त असे की श्री सत्यवान महाजन यांनी अखंड 30 वर्ष सेवा पूर्ण केल्यानंतर ते नुकतेच सेवानिवृत्त झाले. मंगळवार दिनांक 7 जून रोजी सकाळी 11 वाजता महालपुरे मंगल कार्यालय, भडगाव रोड , पाचोरा येथे त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. गिरणाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, तथा माजी नगराध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
याप्रसंगी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन नगरसेवक संजयनाना वाघ, प्रांत अधिकारी विक्रम बांदल, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील’ उपविभागीय पोलीस अधिकारी भारत काकडे, तहसीलदार कैलास चावडे, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी विकासतात्या पाटील, हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ गाळण चे अध्यक्ष बाबूलाल राठोड, गटशिक्षणाधिकारी एन एफ चौधरी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक राजेंद्र चिंचोले, समाज कल्याण निरीक्षक महेंद्र नन्नवरेआदी मान्यवर उपस्थित होते.
दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाजन सरांच सुपुत्र सचिन महाजन, सुकन्या शितल माळी, जावई दिपक माळी, व्याही विकास महाजन, स्नुषा पूजा महाजन, शाळा प्रतिनिधी आर एल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रांताधिकारी व कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या हस्ते सत्यवान महाजन सर व सौ मीनाताई महाजन यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी नानासाहेब संजय वाघ, प्रांताधिकारी विक्रम बांदल, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील , तहसीलदार कैलास चावडे , गटशिक्षणाधिकारी यांनी एन एफ चौधरी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक राजेंद्र चिंचोले, आदींनी महाजन सर यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. सत्काराला उत्तर देताना सत्यवान महाजन सर यांनी कर्तव्य आणि कुटुंब यांची योग्य सांगड घालून दोन्ही क्षेत्रात मनासारखे यश मिळवल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तात्यासाहेब पंडितराव शिंदे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात महाजन सरांच्या पालकत्वाचा गौरव करून स्वतःच्या मुलांना घडवण्यास सोबतच शाळेतील बालकांचा सुयोग्य विकास केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले . ओडिसा येथे कार्यरत आयएएस अधिकारी मनोज महाजन यांनी प्रास्ताविक केले. शिवाजी शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रकटन केले. या कार्यक्रम प्रसंगी श्री सत्यवान महाजन सरांचे नातेवाईक, मित्र ,आप्तेष्ट ,पाचोरा येथील विविध शाळा व संस्थांचे पदाधिकारी, विविध राजकीय व सामाजिक संस्था संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377