माणुसकी समुहातर्फे वाढदिवसाचे औचित्य साधून केले १०१ झाडांचे वृक्षारोपण सु-लक्ष्मी सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम

जामनेर :पाळधी येथील क.द.नाईक माध्यमिक विद्यालय येथे माणुसकी समूहातर्फे रुपाली ताई क्षिरसागर यांच्या वाढदिवसानिमित्ताने १०१ झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले.सविस्तर वृत्त असे की आज वाढदिवस म्हटला की विनाकारण खर्च केला जातो, तो केक, गाजावाजा या गोष्टीला फाटा देत माणुसकी रुग्णसेवा समूह जळगाव जिल्हा अध्यक्ष समाजसेवक गजानन क्षीरसागर यांच्या पत्नी सौ रुपाली क्षीरसागर यांच्या वाढदिवसा निमित्ताने आपण ज्या शाळेमध्ये संस्कार, ज्ञान घेतले त्या शाळेमध्ये १०१ वृक्षारोपण करून वेगळा आदर्श समाजासमोर प्रस्थापित केला. दरवर्षी वाढदिवसाला १०१ झाडांचे वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा केला जातो या अगोदर लोहारा या गावी राम मंदिर, कन्या शाळा, मराठी मुलांची शाळा या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आहे. मात्र या वेळेस आपल्या जन्म गावी म्हणजे पाळधी याठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेवक सुमित पंडित हे होते.त्यांनी आपल्या भाषणात मुलांना पर्यावरणाविषयी माहिती दिली. समाजसेवक गजानन क्षीरसागर यांनीही वृक्षारोपण ही काळाची गरज हे समजावून सांगितले. कविवर्य मंगळदास मोरे यांनीही आपली पर्यावरण विषयक कविता सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गरुड सर यांनी केले, आभार प्रदर्शन पर्यावरण प्रेमी शिक्षक डी एस पाटील सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी माणुसकी ग्रुप जळगाव जिल्हा उपाध्यक्ष चेतन पाटील, राजू नाईक, राजमहल सिंग नाईक, मुख्याध्यापक पी एस पाटील सर, जी एन पाटील सर, एन डी सुशील सर, खोडपे सर, चौधरी सर, विद्यार्थी विद्यार्थिनी, माणुसकी ग्रुप सदस्य शिक्षक व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
महाराष्ट्रात १९७२ नंतरचा सर्वात भिषण दुष्काळ सध्या जानवू लागला आहे. दुष्काळ हा निसर्ग निर्मित नसून मानवाच्या नियोजन शून्य कृतिचा परिणाम आहे असे बोलले जात आहे.कोरोनामुळे आज आपल्याला कुठे झाडांचे महत्त्व कळायला लागले आहे एका आँक्सिजन सिलेंडर चे हजारो रुपये देवुन सुध्दा मिळाले नाही. पन वृक्ष आणि वन याच महत्व संत तुकाराम महाराजांनी चारशे वर्षापूर्वी त्यांच्या ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या अभंगाच्या माध्यमातून सांगीतले आहे. त्यासाठी प्रत्येकाने एक झाड लावून त्याच्या संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली तर महाराष्ट्रात भेडसावू लागलेले संभाव्य धोके रोखण्यात मानवाला यश मिळेल आणि त्यातूनच चिरंतन शाश्वत विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकेल.वनसंपदा आणि नैसर्गिक साधनसंपत्ती ही जीवसृष्टीला लाभलेली देणगी आहे. जंगलसंपदा ही मानवी संपत्ती आहे तेंव्हा ‘वनश्री हीच धनश्री। वृक्ष लावू घरोघरी।।’ हा ध्यास प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



