आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र

पाचोरा पिपल्स बँकेत नोकरी भरती पारदर्शक व बिंदु नामावलीच्या पुर्ततेसह तातडीने करण्यात यावी – संदीप महाजन

पाचोरा – पाचोरा पिपल्स बॅक निवडणुक झाली व एकतर्फी नुतन संचालक मंडळ विराजमान होऊन सुमारे साडेतीन वर्ष पुर्ण झाले.आता फक्त अवघे दिड वर्षं बाकी आहेत.विद्यमान संचालक मंडळाने निवडणुकीमध्ये प्रचारा दरम्यान जुने रोजंदारी, मासीक पगार तत्वावर तात्पुरता स्वरूपातील कर्मचारी ठेवण्यापेक्षा नूतन पारदर्शक भरती करणार असल्याचे जाहीर केले होते
विद्यमान संचालक विराजमान होऊन साडेतीन वर्षे झाले तरी अद्याप कोणत्याही नूतन नोकर भरतीच्या स्पेशली अधिकारी ,कर्मचारी भरती संदर्भात हालचाल करत नसल्याचे दिसत आहे त्यामुळे पाचोरा पीपल्स बँकेत स्पेशली मुख्य कार्यालयात गेल्यानंतर आपलेसे असणारे कर्मचारी व सहकार सेक्शन मध्ये सहकार्य करणारे कोणीही अधिकारी अथवा कर्मचारी दिसून येत नाही अर्थात भूमिपुत्रांना न्याय नाही परिणामतः सभासद , ठेविदार, कर्जदारां मध्ये समाधानकारक सुर नाही याचाच परिणाम पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राहुल अशोक संघवी यांच्या विजयात मोठ्या प्रमाणावर दिसुन आला असो

पाचोरा स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळण्यासाठी तसेच बँकेच्या हितासाठी बँकेमध्ये अष्टपैलू शैक्षणिक व योग्य ती पात्रता असलेले अधिकारी ,कर्मचारी ,शिपाई भरती तातडीने केली जावी व ही भरतीसह सेवा जेष्ठता करत असताना वशिलेबाजी न होता सेवा जेष्ठतेसह बिंदू नामावलीचा कटाक्षाने विचार व पुर्तता करून नियमानुसार सर्व जाती- धर्मांच्या व्यक्तींना न्याय देण्यात यावा शिवाय जी भरती होणार आहे ती भरती वाशिलेबाजीने न होता पारदर्शक अत्याधुनिक टेक्नॉलॉजी प्रक्रीयेसह CCTV कॅमेऱ्यांचा व एजन्सीचा वापर करून पारदर्शक भरती करण्यात यावी अशी मागणी ध्येय न्युज संपादक- संदीप दा महाजन यांनी केली आहे तशा स्वरूपाचे निवेदन दिनांक 9 मे 2022 मंगळवार रोजी पाचोरा पीपल्स बँकेच्या मुख्य कार्यालयात देन्यात येऊन या निवेदनाची दखल दिनांक 20 मे 2023 .पावेतो न घेतल्यास 21 मे 2023 पासून सार्वजनिक आंदोलनाचा लोकशाही मार्गाने आंदोलन उभं करणार असल्याचा इशारा श्री.महाजन यांनी दिला आहे.

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

बातमी लाईक  करा,शेअर करा

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!