पाचोरा दि.6– पाचोरा शहरातील पुनगाव शिवारात समर्थ नगरातील कथित बिल्डर आपल्या जागेत घर संकुलाचे बांधकाम करीत असताना तेथेच गुपचूप वीज तारांवर हूक टाकून वीज चोरी करीत होते. अनधिकृत वीज चोरीचा प्रकार दिवसा ढवळ्या चालू होता, याबाबत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करीत तेथील साहित्य ताब्यात घेतले. शिवाय 60 हजार रुपयांचा दंड त्या तथाकथित उच्च भ्रु बिल्डरकडून वसूल केला.
पुनगाव शिवारात समर्थ नगरातील एका प्लॉट वर घरांचे बांधकाम करीत असताना अधिकृत वीज जोडणी न घेताच वीज वितरण कंपनीच्या तारावर हुक टाकून विजेची चोरी करीत होते, वीज वितरण कंपनीलाच गंडवीत होते. माहितीनुसार, महावितरणची एक टीम तयार करून या पथकाने समर्थ नगरातील यांच्या बांधकाम स्थळांची पाहणी केली व वीज चोरी होत असल्याचे आढळले. कारवाई करीत तेथील साहित्य ताब्यात घेतले, शिवाय 60 हजार रुपयांचा दंड त्या कथित बिल्डरकडून वसूल केला. या कारवाई मुळे वीज चोरांचे दाबे दानाणले आहॆ.
अभियंता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहरभरात जवळ पास 50 विजचोरीचे प्रकरण हाताळण्यात आले. वीज गळती साठी सदर मोहीम राबविण्यात आली. मोहिमेअंतर्गत शाखा अभियंत्यांची पथके पाचोराशहरातील तसेच तालुक्यात वीजचोरी विरोधात जोरदार मोहिम सुरु आहॆ.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377