आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
शेती विषयक (FARMING)
Trending

जिल्ह्यात १० जूलैपर्यंत २७७.३ मिमी पाऊस पेरणीच्या कामांना वेग येणार

जळगाव, दि.१० :- १ जून ते १० जूलै या कालावधीचे राज्याचे सरासरी पर्जन्यमान ३१४.३ मिमी असून या खरीप हंगामात १० जूलै २०२३ पर्यंत प्रत्यक्षात २७७.३ मिमी (१० जुलै पर्यंतच्या सरासरीच्या ७२%) एवढा पाऊस पडलेला आहे. खरीप हंगामातील राज्याचे सरासरी पेरणीचे क्षेत्र १४२ लाख हेक्टर असून १० जूलै, २०२३ अखेर प्रत्यक्षात ४७.१३ लाख हेक्टर (३३ टक्के) पेरणी झालेली आहे. भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार या आठवड्यात पाऊस पडल्यास राज्यात पेरणीच्या कामास वेग येईल.

सद्यस्थितीत पेरणीची कामे संथ गतीने सुरू आहेत. या मध्ये कापूस, सोयाबीन, तूर या पिकांच्या पेरण्या तसेच प्रामुख्याने भात रोपवाटिकेची कामे सुरू आहेत. खरीप हंगाम 2023 करीता 19.21लाख क्विं.बियाणे गरजेच्या तुलनेत सद्यस्थितीत प्राथमिक अंदाजानुसार 21.78 लाख क्विं.बियाणे उपलब्ध आहे. राज्यात 16,82,245 क्विंटल (87%) बियाणे पुरवठा झालेला आहे. त्यामुळे राज्यात खरीप हंगामात करिता आवश्यक बियाणे साठा उपलब्ध आहे. बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेते यांचेकडून बियाणे खरेदी करावे तसेच पावती व टॅग जपून ठेवणे आवश्यक आहे. खरीप हंगाम 2023 करिता राज्यास 43.13 लाख मे. टन खतांच्या पुरवठ्याचे नियोजन मंजूर असून आतापर्यंत 46.07 लाख मे. टन खतांचा साठा उपलब्ध झाला आहे. त्यापैकी 18.95 लाख मे.टन खतांची विक्री झालेली असून सद्यस्थितीत राज्यात 27.12 लाख मे.टन खतांचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार खतांची खरेदी करावी.

कृषीविषयक योजनांच्या माहितीसाठी व तक्रारींचे निवारण करण्यासाठी 18002334000 हा हेल्पलाईन नंबर असून शेतकरी बंधूंनी आवश्यनकतेनुसार त्याचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभाग महाराष्ट्र शासन करत आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) खरीप हंगाम २०२३ मध्ये सहभागी होण्या2चा अंतीम दि. 31 जुलै, 2023 पर्यंत आहे. तरी जास्तीयत जास्त शेतक-यांनी वेळेत अर्ज भरुन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे.

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

बातमी लाईक  करा,शेअर करा


COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!