श्री. गो. से. हायस्कूलमध्ये विविध मैदानी स्पर्धा उत्साहात संपन्न
पाचोरा, दि.30 – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, शहरातील श्री. गो. से. हायस्कूलमध्ये शाळेच्या वर्धापनदिना निमित्त दोन दिवसीय मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन मुख्याध्यापिका प्रमिला वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्याध्यापक एन. आर. पाटील, पर्यवेक्षक आर. एल. पाटील, ए. बी. अहिरे, सांस्कृतिक प्रमुख रहिम तडवी हे उपस्थित होते. या मैदानी स्पर्धांमध्ये सकाळ व दुपार सत्रातील इयत्ता ५ ते १० वी तील विद्यार्थी व विद्यार्थीनींनी स्लो सायकलिंग, १०० मिटर धावणे, पोते स्पर्धा, संगित खर्ची, लिंबु चमचा, दुपार सत्रातील हॉलीबॉल, कबड्डी, रिले, स्लो सायकल या मैदानी स्पर्धांमध्ये आवार्जुन सहभाग नोंदविला. सदरच्या स्पर्धा ह्या अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाल्या. या स्पर्धांमधील विजेत्या खेळाडूंना दि. ३ जानेवारी रोजी बक्षिस वितरण करण्यात येणार आहे. स्पर्धा यशस्वीतेसाठी सर्व क्रिडा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377