शिक्षकाच्या प्रशासकीय बदलीने गहिवरले विद्यार्थी,पालक आणि व्यवस्थापन
नगरदेवळा ता.पाचोरा- गुरू आणि शिष्याचे नाते किती अतूट असते याची अनेक उदाहरणे आपल्या शिक्षण संस्कृतीत सामावलेली आहेत.असाच एक प्रत्यय निपाणे येथील उपशिक्षक दिपक हिरे यांची प्रशासकीय बदली झाल्याने आला.प्रशासकीय बदली झाली नसती तर कधीच जाऊ दिले नसते सर…अशी आर्त भावना विद्यार्थी पालक आणि व्यवस्थापन समितीने व्यक्त केल्याने सरांचे मन ही भरून आले.
नुकत्याच ऑनलाईन शिक्षक बदली प्रक्रियेत जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा निपाणे ता.पाचोरा जि.जळगाव
येथून उपशिक्षक श्री दिपक रमेश हिरे यांची प्रशासकीय बदली संगमेश्वर तालुका-पाचोरा येथे झाली आहे. गेल्या आठ वर्षांपासून दीपक हिरे सर यांनी निपाणे शाळा येथे सेवा दिली. शाळेला आयएसओ मानांकन मिळवून देण्यात तसेच विविध स्तरावर शाळेला यश मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. या शाळेत परिसरातील विविध गावातून येऊन मुले शिकतात ही फार मोठ्या अभिमानाची बाब आहे.
जर का प्रशासकीय बदली नसती तर सरांना कधीच जाऊ दिले नसते असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रावसाहेब मनोहर गिरधर पाटील यांनी याप्रसंगी केले. त्यांनी याप्रसंगी सांगितले सरांनी आमच्या सर्व गावाला सोबत घेऊन दिवस-रात्र मेहनत करून शाळा नावारूपाला आणली.असे शिक्षक लाभणे भाग्याची गोष्ट असून सर्वच टीम खूप छान प्रकारे काम करत आहे. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्री रावसाहेब मनोहर गिरधर पाटील तसेच सरपंच श्री.रोशन धनराज पाटील उपसरपंच श्री शालिक देवराम पाटील तथा सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती, स्वराज्य गणेश मित्र मंडळ यांनी सरांना भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत व सरांनी परत एकदा आमच्या शाळेत यावे असे सांगितले.ग्रामस्थ आणि शिक्षक यांचा इतका सुंदर भावनिक नाते असल्याचे हे अतिशय सुंदर उदाहरण आहे. याआधी दिपक हिरे सर यांनी विष्णुनगर, बोरखेडा याठिकाणी आपली सेवा दिली असून नवनवीन शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना घडविण्यात दिपक हिरे सर यांचा हातखंडा आहे. अशा या ग्रेट गुरुजींना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377