जळगाव, दि. 27 :- उमेदवारांना परदेशातील नोकरी उपलब्ध होण्यासाठी पहिला आंतरराष्ट्रीय रोजगार मेळावा 27 मार्च, ते 26 मे, 2023 या दरम्यान एनएसडीसीमार्फत आयोजित करण्यात आला आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये (JOB FAIR) सहभागी होण्याकरीता उमेदवारांनी https://www.kaushalmahotsav.nsdcdigital.org/International/Candidate/ या लिंकवर ऑनलाईने नोंदणी करावी. असे आवाहन वि.जा. मुकणे, सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
तसेच आस्थापना/कंपन्या, उद्योजक यांनी सहभागी होण्यासाठी https://www.kaushalmahotsav.nsdcdigital.org/International/Company/ या लिंकवर नोंदणी करावी.
भारतातील उमेदवारांना परदेशातील नोकरी उपलब्ध होण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवार तसेच कंपन्या, उद्योजक यांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असेही श्री. मुकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377