पाचोरा बाजार समिती मध्ये कॉंग्रेसची स्वबळावरची तयारी बाजार समिती बचाव पॅनल होणार

पाचोरा दि 27 – शेतकर्यांची कष्टाची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कॉंग्रेस स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी सुरू झाली असुन पाचोरा – भडगाव तालुक्यातील पदाधिकारींच्या उपस्थितीत निर्णय घेण्यात आला.
पाचोरा – भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची असलेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस ची स्वबळावरची तयारी सुरू झाली असुन पाचोरा – भडगाव तालुक्यातील कॉंग्रेस प्रमुख पदाधिकारी यांची आज शासकीय विश्रामगृहात तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत पाचोरा – भडगाव तालुक्यातील काही इच्छुक उमेदवारांची चर्चा झाली यात बाजार समितीला भविष्यात विक्री करणाचा काहींचा डाव असल्याने ही बाजार समिती वाचविणे गरजेचे असुन यासाठी समविचारी पक्ष सोबत आले तरी चालेल अन्यथा स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी वर चर्चा करण्यात आली. या बैठकीत तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, प्रदेश प्रतिनिधी शेख इस्माईल शेख फकीरा, भडगाव तालुका अध्यक्ष रतीलाल महाजन, युवक अध्यक्ष प्रदीप पाटील, भडगाव अल्पसंख्यक तालुका अध्यक्ष कमर अली, सरचिटणीस प्रताप पाटील, ओबीसी सेल तालुका इरफान मनियार, प्रशासन सरचिटणीस शिवराम पाटील, एसी सेल तालुका अध्यक्ष श्रावण गायकवाड, महीला जिल्हा सरचिटणीस कुसुम पाटील, जिल्हा उपाध्यक्षा संगिता नेवे, जिल्हा सदस्या अॅड मनिषा पवार, क्रांती पाटील, रेखा पाटील, तालुका खजिनदार सुनील पाटील, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, शहर उपाध्यक्ष अमजद मौलाना,आदी उपस्थित होते
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



