आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
राजकीय
Trending

बाजार समितीची एक इंचही जागा विक्री होऊ द्यायची नसेल तर रखवालदार म्हणून चोरांची नेमणूक होऊ देऊ नका- आ.किशोर अप्पा पाटील सहकार मेळाव्यात गरजले


पाचोरा,दि.८- पाचोरा भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची संस्था म्हणून पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पाहिले जाते मात्र या बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे सर्वांगीण हित साधण्याची जबाबदारी असलेल्यांनीच मागील काळात शेतकऱ्यांचा विश्वासघात करत शेतकऱ्यांच्या हक्काच्या जागा विक्री करण्याचा सपाटा लावला होता मात्र शेतकरी पुत्र म्हणून आपण हा कट उधळून लावला असून आगामी काळात बाजार समितीची एक इंच ही जागा आपण विक्री होऊ देणार नसून मतदार बांधव देखील जागरूक रहात बाजार समितीच्या रखवालदार म्हणून संचालक मंडळ निवडून देतांना चोरांच्या हातात सत्ता जाणार नाही याची काळजी घेतील असा मला आत्मविश्वास असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर अप्पा पाटील यांनी केले आहे. पाचोरा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच, सदस्य तसेच तालुक्यातील सर्व विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, व्हा.चेअरमन संचालक यांचा उपस्थितीत मोंढाळा रोड वरील तुळजाई जिनिंग येथे शनिवारी दुपारी झालेल्या सहकार मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी मंचावर आमदार किशोर अप्पा पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील,जिल्हा उपप्रमुख गणेश पाटील, डॉ विशाल पाटील,भडगाव तालुका प्रमुख संजय पाटील (भुरा अप्पा),पाचोरा तालुका प्रमुख सुनील पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, माजी नगराध्यक्ष शांताराम सोनाजी पाटील,भडगावचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र महादू पाटील ,शहर प्रमुख किशोर बारावकर,डॉ. भरत पाटील,डॉ. प्रमोद पाटील ,सुमित किशोर पाटील, चंद्रकांत धनवडे,पंढरीनाथ पाटील ,विजय पोपट पाटील, भोला पाटील ,सुरेश राहुल पाटील ,अनिल पाटील ,वसंत पाटील, जयसिंग कारभारी ,युवराज पाटील, जयंत पाटील, खुमानसिंग पाटील ,प्रकाश अमृत पाटील, शिवाजी परदेशी, संजय विलास पाटील, शिवलाल ब्राह्मणे ,राजेंद्र पंडित तायडे ,राजेश सोनवणे ,मोहन पाटील ,लखीचंद पाटील, संजय प्रभाकर पाटील तुळशीराम भोला आप्पा, हिलाल सोमवंशी ,राजेंद्र शिवदास पाटील, पुनम ताई प्रताप पाटील, अर्चना संजय पाटील, संजय शांताराम पाटील, नंदू पाटील, शिवदास पाटील, बापूराव महारु पाटील ,नारायण पाटील, ,गोरख पाटील, विश्वास पाटील ,कैलास पाटील ,मोहन पाटील, सुधाकर वाघ, गोरख पाटील ,बाळू अण्णा,स्वीय सहाय्यक राजेश पाटील, पतींग पाटील,अमोल पाटील, एकनाथ पाटील आदी उपस्थित होते.


सर्वप्रथम निवडणुकीत विविध प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांचा परिचय करून देण्यात आला.पुढे बोलतांना आमदार किशोर अप्पा पाटील म्हणाले की, आजच्या सहकार मेळाव्याला झालेली गर्दी हे आपल्या भविष्यातील विजयाचे द्योतक आहे. बाजार समिती मधील तांत्रिक मुद्यांचा आधार घेत शिवसेनेची सत्ता उलथवून लावल्या नंतर सतीश शिंदे यांनी
५० हजार स्वे फूट जागा कवडीमोल भावाने स्वकीयांना विक्री केली तसेच अजून सुमारे दहा कोटी पेक्षा अधिक किंमत असलेली सुमारे ६५ हजार स्क्वेअर फुट जागा केवळ सव्वा चार कोटीत विक्रीचा घाट घातला होता मात्र तो आपण हाणून पाडला आहे.सत्तेतून संपत्ती कमावण्याची शिंदेंची नियत आहे.मात्र मतदारांचा माझ्यावर विश्वास असल्याने आपण शेतकरी हितासाठी काम करत असल्याचे ते म्हणाले.पाचोरा भडगाव बाजार समिती मध्ये शेजारील मराठवाडा मधील कन्नड, सोयगाव, एरंडोल, अनेक ठिकाणाहून मालाची आवक मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र केवळ पाच कोटीच्या कर्जाचा बहाण्याने जागा विक्रीचा प्रयत्न सुरू आहे. मात्र राज्यात आपले सरकार असून मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांचेकडे पणन मंत्री म्हणून देखील जबाबदारी आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी मुख्यमंत्री यांचे कडून कर्ज फेडी साठी ५ कोटी केव्हाही आणता येतील, विरोधकांना आपले सामोरा समोर चर्चेचे आव्हान असून वरखेडी गुरांच्या बाजार आवारात गुंड आणून शेतकऱयांवर दादागिरी करणाऱ्यांनी कायम व्यापारी,शेतकरी यांना भीतीदायक वातावरणात ठेवले आहे.मात्र आपल्याला शेतकरी विकास पॅनेलच्या माध्यमातून सर्वांसाठी आधुनिक सुविधा निर्माण करायच्या आहेत. कोल्ड स्टोरेज उभे करायचे आहे आपल्या सत्ता काळात जर प्रगती दिसली नाही तर तुम्ही जाब विचारू शकतात मला वेळोवेळी जनतेसमोर जायचेच आहे त्यामुळे आपला विश्वास कायम ढळून देता आपण काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.सहकारात राजकारण नसते त्यामुळे राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ यांचे सोबत देखील चर्चा झाली आहे.तसेच शिंदे वगळता इतर भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते देखील शेतकरी हितासाठी सोबत यायला तयार असल्याचा खुलासा देखील त्यांनी यावेळी केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश पाटील यांनी केले

यावेळी डॉ विशाल पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती अनिल पाटील, भडगावचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील यांनी देखील भाषणातून बाजार समितीच्या कारभारावर टीका केली. सूत्रसंचालन प्रवीण ब्राह्मणे यांनी तर आभार पंचायत समितीचे माजी सदस्य पंढरीनाथ पाटील यांनी मानले.

“घोडा विकत घेण्याआधी यांची नालची तयारी”
निवडणूक २८ एप्रिल रोजी असून त्यानंतर निकाल जनता जनार्दन ठरवणार आहे मात्र विरोधकांनी आतापासून जनतेला गृहीत धरून चेअरमन पदावरून भांडणे सुरू केली आहेत. हा प्रकार म्हणजे “घोडा विकत घेण्याआधी यांची नालची तयारी” असा आहे अशी टीका आमदार किशोर अप्पा पाटील यांनी विरोधकांवर केली.

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: CALL ME 8411009377 \\\\