आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र
Trending

पाचोरा येथे 7 दिवसीय शिव महापुराण कथा व महारूद्राभिषेकाचे आयोजन

पाचोरा- शहरातील पांडव कालीन पाताळेश्‍वर मंदिर जिर्णोध्दार समिती आयोजित ग्रिन अ‍ॅपल इव्हेटस् प्रस्तुत पाचोरा पत्रकार बांधव यांच्या सहकार्याने 8 दिवसीय शिव महापुराण कथा व महारूद्राभिषेकाचे दिनांक 29 एप्रिल 2023 ते 06 मे 2023 पावेतो आयोजन करण्यात आले आहे.
एक लोटा जल, सारी समस्याओंका हल हे ब्रिद वाक्य संपूर्ण जगभर प्रसारीत करणारे आंतरराष्ट्रीय कथावाचक भागवतभूषण पं.पु.प्रदीपजी मिश्रा (सिहोरवाले) यांचे कृपापात्र शिष्य प.पु.पंडीत संजयजी शर्मा यांच्या अमृतवाणीतून शिवमहापुराण कथेसोबतच महारूद्राभिषेक कार्यक्रम संपन्न होणार आहे. यासाठी एक दिवसीय महारूद्राभिषेकासाठी रू.2500/- , 7 दिवसीय रूद्राभिषेकासाठी रू.11000/-, कुटूंबासह आरतीचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांना रू.15000/- निश्‍चीत करण्यात आले आहे. वेळ व जागेची उपलब्धता लक्षात घेता सर्व प्रवेश मर्यादित असल्याने प्रथम प्रवेश प्रथम प्राधान्य या तत्वावर भाविकांना संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे याशिवाय या अभिषेकामध्ये सहभागी असलेल्या भाविकांना (1) शिवलिंग (2) नंदी (3) नागदेवता (4) त्रिशुल (5) जलाधारी (6) जलाधारी स्टँड (7) दोन रूद्राक्ष जिर्णोध्दार समितीतर्फे भेट देण्यात येणार आहे. अभिषेकाची वेळ सकाळी 7.30 ते 9.30 तर कथेची वेळ दुपारी 4.00 ते सायं.7.00 निश्‍चीत केली असून कथा समाप्तीनंतर उत्तराखंडमधील नैनीताल येथील सोनूजी बक्षी व सहकारी यांच्या वतीने सुंदर झाँकीचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे
तसेच दि.29 एप्रिल रोजी दु.3.00 वाजेपासून शिव कॉलनी लगत असलेले पाताळेश्‍वर मंदिराचे पुजन करून हिवरा नदी, कृष्णापुरी पुलापासून-जामनेर रोड-छत्रपती शिवाजी महाराज चौक-भडगाव रोड मार्गे शोभा यात्रा काढण्यात येणार असून भडगाव रोडवरील कैला देवी मंदिरा शिवप्रभू मैदानात शोभा यात्रेचा समारोप होणार आहे. यामध्ये कलश यात्रेत सहभागी होणार्‍या महिलांसाठी रू.151/- ची देणगी निश्‍चीत करण्यात आली असून कलश समितीच्या वतीने भेट देण्यात येणार आहे. तरी भाविकांनी आपले नाव नोंदणीसाठी तरी भाविकांनी आपले नाव नोंदणीसाठी पाचोरा येथील 1) विजय रेडीमेड भडगाव रोड 2) सत्यम मेडीकल मानसिंगका कॉर्नर 3) अग्रवाल एसटीडी जामनेर रोड 4) शरद ट्रेडींग कृष्णापुरी 5) दिपक पान सेंटर सिंधी कॉलनी 6) संजय पटवारी आठवडे बाजार 7) श्रध्दा मार्बल भडगाव रोड 8) उमिया मार्बल उल्हास टॉकीजजवळ 9) हिमाई टायर्स कृष्णापुरी बायपास हायवे रोड येथे संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
पाचोरा-भडगाव शहर व परिसरातील सर्व धर्मिय रिक्षा चालकांचा बॅनर लावण्यास उत्स्फुर्त सहभाग
प.पु.पंडीत प्रदीपजी मिश्रा यांच्या अमृतवाणीमुळे संपूर्ण जगभर शिवपुराण कथा व त्याचे महत्व सर्वत्र बघायला मिळत आहे. यामुळे सद्यस्थितीत आपल्या परिसरातील एक लोटा जल, सारी समस्याओंका हल प्रत्येक महादेव मंदिरात मोठ्या प्रमाणावर महिला-पुरूष भाविकांची वर्दळ दिसून येत आहे. तर कोणी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष देखिल सहभागी होत आहे.

मुस्लीम बांधव रिक्षास बॅनर लावत आहे

मुस्लीम व सर्व धर्मीय बांधव रिक्षास बॅनर लावत आहे,असाच अनुभव या शिवमहापुराण कथा व महारूद्राभिषेकाचे बॅनर लावण्यासाठी गेलेल्या सहकार्याना आला. कोणत्याही प्रकारचा मोबदला न घेता पाचोरा-भडगाव शहर व परिसरातील सर्व धर्मिय रिक्षा चालकांचे बॅनर लावण्यास उत्स्फुर्त सहकार्य तर लाभेलच विशेष म्हणजे मुस्लिम-दलित बांधवांनी देखिल स्वत:हून आपल्या रिक्षांवर बॅनर लावले हे विशेष असे आहे.

कार्यक्रमास्थळी उभारण्यात येणार्‍या मंडपाचे व परिसराचे नियोजन
पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील कैला देवी मंदिर शिवप्रभू मैदानावरील 200 x 600 जागेवर कार्यक्रम संपन्न होणार असून प.पु.पंडीत शर्माजी व त्यांच्या समुहासाठी 80x 40 चे स्टेज यात दोन्ही बाजूला 20 x 15 च्या दोन स्वतंत्र रूम 1) झाँकी कलाकारांसाठी 2) वाद्यवृंदांकरिता आरक्षित करण्यात आली आहे.
गुरूंजीसाठी 6 x 6 चे स्वतंत्र स्टेज * गुरूंजीच्या व्यासपिठासमोर आरती यजमान कक्ष त्यांच्या मागे वाद्यवृंद कक्ष दोन्ही बाजूला असलेल्या जागेत मुख्य यजमान कक्ष व पोलिस,अधिकारी,पत्रकार,प्रमुख अतिथी कक्ष, मुख्य यजमानांच्या मागे समिती सदस्य कक्ष, दोन्ही बाजूला महिला व पुरूष कक्ष अशी बैठक व्यवस्था असून मधोमध जो रस्ता राहणार आहे त्या ठिकाणी 10 फुटाची रूद्राक्ष असलेली महादेवाची पिंड त्यावर सतत होणारा जलाभिषेक वाद्यवृंदाच्या मागे जळगाव येथील श्री.रूपेश महाजन यांचे लाईव्ह प्रक्षेपणसाठी कॅमेरा व इतर साहित्य तसेच स्टेज संभाव्य सुमारे येणारे भाविक 50 हजार यांची वर्दळ लक्षात घेता थेट प्रक्षेपणासाठी मंडपाच्या दोघं बाजूला 12 x 20 चे 4 एलईडी उपलब्ध असणार आहे. मंडपासाठी महाराष्ट्रातील नामांकित चाळीसगाव येथील दायमाजी तर अत्याधुनिक साऊंड सिस्टीम इंदौर येथून मागविण्यात आली आहे. तसेच कार्यक्रम समाप्तीनंतर भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात येणार असून या कार्यक्रमासाठी ज्या दानशूरांना स्वेच्छेने रोख,वस्तू,महाप्रसादासाठी लागणारे साहित्य अथवा शारिरीक मेहनत स्वरूपात योगदान द्यायचे असेल त्यांनी आयोजकांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: CALL ME 8411009377 \\\\