आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र
Trending

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्गत कार्यरत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजातील (चांभार, मोची, ढोर व होलार) व्यक्तीचे जीवनमान उंचावणे. समाजप्रवाहात मानाचे स्थान मिळविण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी विविध शासकिय योजना महामंडळाच्या जिल्हा कार्यालयामार्फत आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये राबविल्या जाणार आहेत.

राज्यशासनाच्या अनुदान योजना व बीज भांडवल योजनेसाठी कार्यालयास विविध शासकीय योजनांचे भौतिक व आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अर्ज स्वीकृतीकरीता अटी व शर्तीनुसार कार्यालयात स्विकारण्यात येणार आहेत.

विशेष घटक व बीज भांडवल योजनेतंर्गत चे यापूर्वीचे जुने कर्जप्रस्ताव रद्यबातल करण्यात येतील. कर्ज मागणी घटक व बीज स्वहस्तांक्षरात/टंकलिखीत अथवा महामंडळाच्या विहित नमुन्यातील झेरॉक्स प्रतीत अर्ज स्विकारण्यात येतील. महामंडळ राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर लावण्यात आलेली आहे. महामंडळ राबवित असलेल्या कुठल्याही शासकिय योजनेचा पती अथवा पत्नी यांनी लाभ घेतलेला असल्यास किंवा अर्जदार हा कुठलाही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार असल्यास कर्जप्रस्ताव अपात्र करण्यात येईल. अर्जदार यांनी नमुद केलेल्या कागदपत्रांसह जिल्हा कार्यालयात व्यक्तीशः अर्ज दाखल करणे अनिवार्य असून कर्जप्रस्ताव मध्यस्थामार्फत स्विकारले जाणार नाही. अर्जदाराकडून सर्व परिपूर्ण कागदपत्र असलेलेच कर्ज प्रस्ताव स्विकारले जातील. अर्जदाराने अर्जासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्रांवर अर्जदाराची स्वाक्षरी आवश्यक असून अर्जदाराने दाखल केलेली कागदपत्रे खोटी आढळून आल्यास त्यास जबाबदार धरून त्याच्यावर पुढील कार्यवाही करण्यात येईल. मध्यस्थ हे जर कामामध्ये हस्तक्षेप करीत असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करुन शासकीय कामांत अडथळा या सदराखाली संबंधीत मध्यस्थावर गुन्हा दाखल करण्यात येईल. कर्जप्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर लाभार्थी निवड समितीच्या बैठकीमध्ये मान्यता घेऊन नंतरच कर्ज प्रस्ताव मंजूरीसाठी बँकेस/ महामंडळाच्या प्रधान कार्यालयास पाठविण्यात येतील. प्राप्त कर्जप्रस्ताव बँकेस पाठवितांना एका उद्यिष्टांस दोन पट या पध्दतीने कर्जप्रस्ताव जेष्ठतेनुसार बँकेकडे शिफारस करण्यात येतील.

कर्जप्रस्तावासोबत दाखल करावयाची कागदपत्रे- जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला (चालू वर्षांचा), रेशनकार्ड झेरॉक्स/ रहिवाशी दाखला, मतदान ओळखपत्र,आधारकार्ड, कोटेशन(GSTसह), आवश्यकतेनुसार प्रकल्प अहवाल, वाहनाकरिता लायसन्स/परतावा/बॅच बिल्ला, जागेचा पुरावा लाईटबिल/टॅक्सपावती, व्यवसायाचे नाहरकत प्रमाणपत्र,

केंद्र शासनाच्या योजना – एन.एस.एफ.डी.सी. योजना- जुन्या प्रलंबित कर्जप्रस्तावाबाबत महत्वाची सूचना – ज्या लाभार्थ्यांनी यापूर्वी एन.एस.एफ.डी.सी. कर्ज योजनेतंर्गत कर्जप्रस्ताव जिल्हा कार्यालयात दाखल केलेले असून ज्याची लाभार्थी निवड समिती झालेली आहे व जे परिपूर्ण कर्जप्रस्ताव जिल्हा कार्यालयामार्फत प्रधान कार्यालयास मंजुरीसाठी शिफारस करण्यात आलेली आहेत. अशा लाभार्थीची यादी महामंडळाच्या नोटीस बोर्डावर लावलेली असून संबंधित अर्जदारांनी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयास संपर्क करुन कागदपत्रे तात्काळ दाखल करावी. लाभार्थ्याचे उद्योग आधार प्रमाणपत्र. लाभार्थ्यांचा विनंती अर्ज, कागदपत्रे खरी असल्याबाबत व ज्या जागी व्यवसाय चालु आहे त्याच जागेचा प्रमाणित केलेले छायाचित्र, चालू वर्षांचा उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी दाखला. दोन सक्षम जामीनदारांपैकी नोकरदार असेल तर त्याच्या कार्यालयाचे लाभार्थ्याने वसुलीचा भरणा केला नाहीतर जामीनदाराच्या पगारातून कपात करुन भरणा करण्यात येईल असे कार्यालयाचे हमीपत्र, जर लाभार्थ्यांचा जामीनदार सरकारी नोकरदार असेल व तो सेवानिवृत्त झालेला असेल त्याच्याऐवजी ज्या कर्मचाऱ्यांची सेवा 5 ते 6 वर्ष बाकी आहे असा जामीनदार घेणे आवश्यक. जिल्हा व्यवस्थापक यांचा स्थळपाहणी अहवाल व शिफारस. लाभार्थ्याचा सिबील क्रेडीट स्कोअर. अर्जदाराचे वारसदारांच्या स्वाक्षरीसह नामांकन शपथपत्र. यापूर्वी कर्जाच्या अर्जाबरोबर सादर केलेल्या इतर कागदपत्रांची खातरजमा उदा. जातीचा दाखला, रेशनकार्ड, रहिवाशी दाखला, निवडणूक आयोग ओळखपत्र इ. लाभार्थ्याचा आधारकार्ड क्रमांक तसेच आधार संलग्न (Link) बँक खाते क्रमांक, जी. एस. टी. क्रमांकासह व्यवसायाचे दरपत्रक. अर्जदाराचे विहित नमुन्यातील शपथपत्र आदि कागदपत्रे तात्काळ दाखल करावीत.
जास्तीत जास्त पात्र लाभार्थीनी शासकीय योजनेचा लाभ घ्यावा व आपली सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक प्रगती साध्य करुन आपला सामाजिक स्तर उंचवावा. असे आवाहन एस. एन. तडवी, जिल्हा व्यवस्थापक संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

बातमी लाईक  करा,शेअर करा

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!