
पाचोरा- येथील श्री संत गाडगेबाबा शिक्षण संस्था संचलित स्वर्गीय कालिंदीबाई पांडे मतिमंद निवासी विद्यालय जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्रीगोपाल घनश्याम पाटील चोपडा त्यांनी भूषविले तर श्रीमती सोनाली मिस्तरी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या तसेच तज्ञ मार्गदर्शक डॉक्टर श्री संजय जी माळी हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून डॉक्टर हेलन केलर आणि लुईस ब्रेल या दिव्यांग क्षेत्रातील उत्तुंग कार्य करणाऱ्या महानुभावांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले याप्रसंगी डॉक्टर संजय जी माळी एमडी आयुर्वेदिक यांनी दिव्यांग मुले त्यांच्या समस्या त्यांचा मानसिक सामाजिक भावनिक शारीरिक विकासात दीव्यांग शाळा आणि पालकांची भूमिका विशद केली तसेच पालकांचे समुपदेशन सुद्धा त्यांनी केले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते त्यांनी त्यांच्या समस्या आणि पाल्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण व्यवहारा संदर्भात चर्चा केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



