विद्यार्थ्यांनी आहारामध्ये पौष्टीक तृणधान्याचा समावेश करावा – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर

कृषी प्रक्रिया जनजागृती पंधरवाडा
जळगाव,दि.४ ऑगस्ट – विद्यार्थ्यांनी आपल्या रोजच्या दैनंदिन आहारामध्ये पौष्टीक तृणधान्याचा समावेश करावा. अशा शब्दात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी आज येथे मार्गदर्शन केले.
कृषी विभागाच्या वतीने कृषी प्रक्रिया जनजागृती पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. यात प.न लुंकड व नंदीनीबाई वामनराव कन्या शाळा व विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्य (मिलेट) विषयी जागरुकता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. ठाकूर बोलत होते.
याप्रसंगी कृषी उपसंचालक चंद्रकांत पाटील, प्रकल्प संचालक पांडुरंग साळवे, सहायक अधीक्षक देविदास कोल्हे, जिल्हा तंत्र सल्लागार अमित पाटील, तंत्र सहायक विवेक चव्हाण, प.न लुंकड कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती नेवे, नंदीनीबाई वामनराव कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका चारुलता पाटील आदी उपस्थित होते.
श्री.ठाकूर म्हणाले की, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना तसेच आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत व प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उन्नयन योजना अंतर्गत २०२३ वर्ष हे मिलेट वर्ष म्हणून घोषित झाले आहे. या महिन्याचे प्रमुख पिक हे राजगीरा आहे.
यावेळी राजगिरा पासून तयार केलेली लाडूची पाकिटे वितरीत करण्यात आली. या कार्यक्रमास २५० ते ३०० शालेय विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



