अतिरिक्त लोड शेडिंग ततत्काळ बंद करा ऊबाठा तर्फे निवेदन सादर
पाचोरा: दिनांक 1 सप्टेंबर 2023 रोजी तालुक्यात होणारी लोड शेडिंग बंद करण्याबाबत ताईसो. वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी नेत्या, शिवसेना (उ बा ठा), दिपक राजपूत (जिल्हा उपप्रमुख) उद्धव मराठे (उपजिल्हाप्रमुख), अरुण पाटील (शेतकरी सेना जिल्हाप्रमुख) यांच्या नेतृत्वात मा. कार्यकारी अभियंता सो वीज वितरण कंपनी पाचोरा, विभाग पाचोरा यांना आवेदन देण्यात आले. पाचोरा-भडगाव तालुक्यात एक महिना उशिरा पेरण्या झाल्या आहेत. जुलै – ऑगस्ट महिन्यात साधारण पाऊस झाला. गेल्या वीस दिवसांपासून पावसाने ओढ दिली. त्यामुळे पिके करपून चालली आहेत. खरिपाचा हंगामा धोक्यात येण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे.शेतकरी राजा चिंताग्रस्त आहे, विहिरीत थोड्याफार प्रमाणात पाणी साठा शिल्लक आहे. मात्र सतत लोड शेडिंग मुळे बळीराजा आपले सोन्यासारखे पिकं वाचू शकत नाही डोळ्यासमोर पीक नष्ट होतांना पाहत आहे. दुबार पेरणी, पावसाची ओढ, पेरणी साठी कर्ज काढून केलेला खर्च, उत्पन्नाची हमी नाही. अशा भयावह परिस्थितीमुळे बळीराजा हतबल झालेला आहे.घरगुती विजपुरवठ्याच्या अतिरिक्त लोड शेडिंग मुळे लहान मुले, वृद्ध आई-बाबा, नागरिक हैराण झालेले आहेत. मच्छर व डासांचा त्रास आहे. ऐन झोपेच्या वेळी वीज गायब होते त्यामुळे मनस्ताप निर्माण होतो. सुरळीत वीज पुरवठा करणे हे शासनाचे कर्तव्य आहे. वीज पुरवठा मिळणे हा बळीराजाचा हक्क आहे. मात्र शासन प्रशासनाच्या आडमुठेधोरणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे, हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे.पाचोरा भडगाव शिवसेना पक्ष हे कदापि सहन करणार नाही तत्काळ लोडशेडिंग रद्द करून तातडीने वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरणार आंदोलन छेडणार तथा दिनांक 9 सप्टेंबर 2023 रोजी पाचोरा येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत माननीय मुख्यमंत्री महोदयांना घेराव घालणार आहे होणाऱ्या परिणामांना आपण जबाबदार रहाल आमच्या भावना शासन दरबारी कळवाव्यात अशा प्रकारे हे आवेदन पत्र वीज वितरण कंपनी यांना देण्यात आले या प्रसंगी जिल्हा प्रमूख दीपक राजपूत,शरद पाटील (तालुकाप्रमुख), दीपक पाटील (शहरप्रमुख), अनिल सावंत (शहर प्रमुख), जेके पाटील (विधानसभा क्षेत्र प्रमुख), राजेंद्र राणा (शहर संघटक), मनोहर चौधरी (शहर प्रमुख भडगाव), शंकर मारवाडी (शहर प्रमुख भडगाव), दादाभाऊ चौधरी (शहर संघटक शिवसेना पाचोरा), भारत खंडेलवाल (माजी शहरप्रमुख), गौरव पाटील (उपजिल्हा संघटक युवासेना), शशी पाटील (तालुका अध्यक्ष युवा सेना), तिलोंत्तमा मौर्य (जिल्हा संघटिका शिवसेना), मंदाकिनी पारोचे, कुंदन पंड्या, जयश्री येवले, अनिता पाटील, (महिला आघाडी) विलास पाटील, आबा देसले, पप्पू जाधव, मनोज चौधरी, भरत पाटील, अजय पाटील, निलेश गडरी, दादाभु तड़वी, नितीन लोहार, हेमंत पाटील, फहीम शेख, अनिल परदेशी, एकनाथ अहिरे, गुरुलाल पवार, दत्तू अहिरे, अभिषेक खंडेलवाल, खंडू सोनवणे, प्रवीण शिंदे, प्रवीण वाघ, निखिल सोनवणे, मयूर भोई, राहुल पाटील, नितीन खेडकर, गौरव पाटील, सह समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377