श्री.गो.से. हायस्कूल पाचोरा येथे विविध स्पर्धा व बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न.
पाचोरा – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथे खान्देशचे लोकनेते व पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष स्व.आप्पासाहेब ओ.ना.वाघ यांच्या स्मृती प्रित्यर्थ दि.16 ऑक्टोबर रोजी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
इयत्ता 5 वी ते 7 वी च्या गटात स्लो सायकलिंग, 100 मीटर धावणे, संगीत खुर्ची यासारख्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच शुद्धलेखन स्पर्धा व रंगभरण स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात आली होती.
इयत्ता 8 वी ते 10 वी च्या गटात निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्टपणे सहभाग नोंदवला.
दि. 17 ऑक्टोबर रोजी विविध स्पर्धात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन संजय ओंकार वाघ,संस्थेचे व्हा. चेअरमन व्ही.टी.जोशी, शालेय समिती चेअरमन खलील देशमुख, संस्थेचे ज्येष्ठ संचालक सतीष चौधरी, शाळेचे माजी पर्यवेक्षक शांताराम चौधरी सर, बी. एस. पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित सर्व मान्यवरांनी स्वर्गीय आप्पासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. . रुपेश पाटील व श्री. सागर थोरात यांनी ईशस्तवन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
विविध स्पर्धातील गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य व प्रमाणपत्रांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कु.प्रणवी पाटील या इ. दहावीच्या विद्यार्थिनीने आप्पा साहेबांचे कार्य व कर्तृत्व विद्यार्थ्यांसमोर स्पष्ट करून सांगितले.
अध्यक्षीय भाषणातून व्ही.टी.जोशी यांनी स्व. आप्पासाहेबांच्या शैक्षणिक, सामाजिक व राजकीय कारकीर्दीचा गौरव केला. या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमिला एम.वाघ ,उपमुख्याध्यापक एन. आर.ठाकरे, पर्यवेक्षक आर.एल. पाटील ,ए.बी. अहिर,अंजली आर.गोहिल , तांत्रिक विभाग प्रमुख एस.एन.पाटील ,किमान कौशल्य विभाग प्रमुख मनीष बाविस्कर,कार्यालयीन प्रमुख अजय सिनकर, सांस्कृतिक प्रमुख रहीम तळवी .सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. बी. बोरसे तर आभार रुपेश पाटील यांनी केले .
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377