स्वातंत्र्याचा शतकोत्सव साजरा करताना गौरव वाटेल अश्या कामांचे नियोजन करावे -माजी सनदी अधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर

जळगाव दि.24 – जिल्हयाला गौरवशाली परंपरा लाभली आहे. जळगावचे केळी, सोने, कापूस देशभरात प्रसिध्द आहे. चटईसह विविध उद्योगांनी भारतातच नव्हेतर परदेशातही जावून जळगाचा झेंडा फडकविला आहे. जिल्ह्यात सिंचनामुळे शेतीला मोठा दिलासा आहे. कृषी, औद्योगिक विकासही चांगला होत आहे. रेल्वे, महामार्गाचे जाळे आहे. विमान सेवेचे जाळेही लवकरच विस्तारीत होइल. पायाभुत विकासासोबत कृषी, औद्योगिक क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी शासकीय यंत्रणांनी आगामी तीस वर्षात करावी. जेणेकरून २०४७ मध्ये स्वातंत्र्यांचे शतक साजरे करताना गौरव वाटेल अशी कामे शासकीय यंत्रंणांनी करावी, असा मोलाचा सल्ला माजी सनदी अधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी आज येथे दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आज सुशासन सप्ताह कार्यशाळा झाली, त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यावेळी उपस्थित होते.
प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी करीत जिल्ह्यात राबविणेत आलेल्या नाविण्यपूर्ण उपक्रमाची माहिती दिली.
उपजिल्हाधिकारी (महसूल प्रशासन) जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव यांच्या तर्फे कालबाह्य नोंदीबाबत केलेल्या कार्यवाहीची यशोगाथा पीपीटीव्दारे सादरीकरण उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांनी केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्र वाटपाबाबत करणेत आलेल्या कार्यवाहीची यशोगाथा पीपीटीव्दारे सादरीकरण दिव्यांग मंडळाचे अध्यक्ष डॉ. मारुती पोटे यांनी केले.
संजय गांधी योजनेचे तहसिलदार जितेंद्र कुंवर यांनी पेंशन आपल्या दारी या उपक्रमाची यशोगाथा सादर केली.
पेपरलेस व फेसलेस वाहन परवाना देण्याबाबत कार्यान्वीत उपक्रमाची यशोगाथा पीपीटीद्वारे
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक विशाल बटुळे यांनी केले.
पोलिस अधीक्षक राजकुमार, डॉ. आशिया, जिल्हाधिकारी मित्तल यांनी जिल्ह्याच्या विकासाचा आलेख मांडत भविष्यात जिल्हयाचा अधिक विकास कसा होइल याबाबत मार्गदर्शन केले.
माजी जिल्हाधिकारी राजूरकर यांनी जळगाव जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत कालावधीत जिल्ह्याची प्रगती याबाबत माहिती दिली. जळगाव जिल्ह्याचा २०४७ पर्यंत विकास करावयाच्या मुद्यांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. तहसिलदार सुरेश थोरात यांनी आभार मानले.
या कार्यशाळेस जिल्ह्यातील सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



