पाचोरा येथील तब्ब्ल 5 महिनेपासून अंगणवाडीताई पगारापासून वंचित, राज्यशासना कडे तक्रार दाखल. न्याय मिळेल ?
पाचोरा – तालुक्यात अंगणवाडी मदतीसांचा पगार नियुक्ती पासून अद्यापही झाला नसल्याने या ताईंवर मोठा अन्याय होत असल्याने पाचोरा तालुक्यातील समाजसेवक निलेश उभाळे हे ताईंच्या मदतीला धावले असून याबाबत त्यांनी तक्रार वरिष्ठ स्तरावर दाखल केल्याची माहिती आज दिनांक 21 फेब्रुवारी बुधवार रोजी हाती आली आहे, सदर तक्रार संबंधित अधिकाऱ्यांकडे करण्यात आली असून याबाबतची माहितीस्तव प्रती मा. मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य, मा.राष्ट्राध्यक्ष भारत राष्ट्र, मा.प्रधानमंत्री भारत राष्ट्र, मा.राज्यपाल (महाराष्ट्र राज्य), मा.मुख्यमंत्री (महाराष्ट्र राज्य मंत्रालय-४०००३२), यांकडे देखील पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती निलेश उभाळे यांकडून मिळाली आहे, तसेच पाचोरा-भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मतदारसंघात महिलांवर होत असलेला अन्याय हा अमान्य असून आमदार आप्पासाहेब देखील तात्काळ लक्ष देतील असे निलेश उभाळे यांनी सांगितले, तर तक्रारीत म्हंटले आहे की, माननीय महोदय साहेब जळगाव जिल्ह्यातील पाचोरा या तालुक्यातील एकात्मिक बाल विकास सेवाप्रकल्प अंगणवाडी या विभागात पाचोरा तालुक्यातील अंगणवाडी मध्ये मदतनीस म्हणून सुमारे 50 ते 55 महिलांना अंगणवाडी मदतनीस म्हणून नियुक्ती देण्यात आली होती, सदर महिला या कामावर रुजू देखील झाल्या आहेत व नित्यनियमाने रोज कामावर हजर देखील होत आहेत, त्या दिवसापासून आज पावतो काम सुरू आहे, सदर नियुक्ती ही 1 सप्टेंबर 2023 रोजी पासून देण्यात आली होती, तरी त्या दिवसापासून ते आज पावतो तालुक्यातील एकाही महिलेस अद्याप पर्यंत एकाही दिवसाचा वा महिन्याचा पगार देण्यात आलेला नाही, व इतर कोणतेही देय भत्ते देखील देण्यात आले नसल्याची माहिती तक्रारदार महिलांच्या तोंडून समोर आली असल्याने पगार देयके एकाही महिलेस का देण्यात आला नाही व सदर पगारी देण्यात विलंब का होतोय याबाबत सखोल चौकशी होऊन सविस्तर अधिकृत माहिती मिळावी तसेच यात जर कुणी अधिकारी व कर्मचारी पगारीत देण्यास टाळाटाळ करत असेल तर त्यांवर कठोर कारवाई होऊन केलेल्या कारवाई बाबतची माहिती प्राप्त व्हावी तसेच पाचोरा तालुक्यातील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अंगणवाडी कार्यालय येथील CDPO म्हणून जे कारभार पाहताय ते प्रभारी पदी असल्याने या तालुक्यातील अंगणवाडी बाबतची सर्वच कामे रखडली गेलेली आहेत कोणतीही महत्त्वाचे ऑनलाईन व ऑफलाईन काम हे पूर्ण झालेले नाही त्यामुळे येथील बालके ही शिक्षणापासून व इतर मिळणाऱ्या सर्वच वस्तू व घटकांपासून वंचित झालेले आहेत, यास कारणीभूत असलेले अधिकारी व येथील कर्मचाऱ्यांवर देखील कठोर कारवाई व्हावी व केलेल्या कारवाईचा अहवाल प्राप्त व्हावा, CDPO प्रभारी अधिकारी व येथील क्लार्क हे आपल्या कामात कुचराई करत असल्याबाबत निदर्शनास येत असून त्यामुळे सर्व पगारे कामे खोळंबली असल्याबाबतची चर्चा तालुक्यात सुरू असल्याने सर्वच महिला आपल्या हक्काच्या पगारापासून वंचित झाल्याची माहिती मिळत आहे,
या महिला लवकरच आंदोलनाच्या पवित्रात असल्याबाबतची माहिती देखील समोर येत असून, लवकरात लवकर या दोषींवर कठोर कारवाई होऊन सर्वच महिलांना पगारी वेळेवर मिळून इतर देय भत्ते देखील मिळावेत ही विनंती करण्यात आली आहे. तसेच पाचोरा शहरातील एकात्मिक बाल विकास प्रकल्पातील कार्यालयावर कुणाचेच लक्ष नसल्याने येथील अधिकारी व कर्मचारी हे कामचुकार झाले असून येथे थंबमशीन कार्यरत करावी यांची दैनंदिन हजेरी घ्यावी असे तक्रारीत नमूद केले आहे .
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377