जळगाव मध्ये 23 फेब्रुवारी पासून होणार नाशिक महसूल विभागाच्या,क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा
राज्याचे महसूल मंत्री करणार स्पर्धेचे उदघाटन
राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती
जळगाव दि.21 – नाशिक महसूल विभागातील पाच जिल्ह्यातील महसूल अधिकारी, कर्मचारी यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 23 फेब्रुवारी पासून छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल मध्ये होणार असून राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते 23 रोजी सकाळी 9 वाजता या स्पर्धांचे उदघाटन होणार आहे. तर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल देसाई, राज्याचे महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
यावेळी खा. श्रीमती रक्षा खडसे, खा. उन्मेष पाटील, आ. एकनाथ खडसे, आ. किशोर दराडे, आ. सत्यजित तांबे, आ. चिमणराव पाटील, आ. संजय सावकारे, आ. शिरीष चौधरी, आ. सुरेश भोळे, आ. किशोर पाटील, आ. मंगेश चव्हाण उपस्थित राहणार आहेत.
या महसूल स्पर्धा 23, 24, 25 फेब्रुवारी अशा तीन दिवस असतील.या स्पर्धेचे यजमानपद जळगाव जिल्ह्याला लाभले असून यासाठी पाच जिल्ह्यातून पाच संघ आणि एक आयुक्त कार्यालयाचा असे एकूण सहा संघ असणार आहेत. यात एकूण 14 क्रीडा प्रकार खेळले जाणार असून, त्यात सांघिक सामने 48, वैयक्तिक सामने 208 असे एकूण 256 सामने खेळले जाणार आहेत. या स्पर्धेत पुरुष खेळाडू 607 तर महिला खेळाडू 177 असे एकूण 784 खेळाडू सहभागी आहेत. यात सांस्कृतिक स्पर्धाही होणार असून त्यात गायन, वादन, अभिनय, नृत्य, निवेदन, समुहगान, नाटीका आदिचा समावेश आहे. वैयक्तिक स्पर्धेमध्ये पहिले, दुसरे, तिसरे पारितोषिक असणार आहे. तर सांघिक स्पर्धेत विजेता आणि उपविजेता निवडला जाणार आहे.
या स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, पोलीस परेड ग्राउंड व एकलव्य क्रीडा संकुलात होतील.
या स्पर्धेचा बक्षीस समारंभ रविवार दि. 25 फेब्रुवारी रोजी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे. नाशिक विभागाचे आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा, धुळ्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल, नंदुरबारचे जिल्हाधिकारी मनिषा खत्री, अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे या स्पर्धेचे निमंत्रक आहेत.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377