आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
आरोग्य व शिक्षण

श्री.गो. से हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या महानाट्याने रसिकांची मने जिंकली!

पाचोरा – शिवजयंती निमित्त श्री. गो. से. हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी सादर केलेले “सुवर्णयुग माझ्या शिवबाचे” हे महानाट्य रसिकांच्या मनावर राज्य करणारे ठरले. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट अभिनय, वेशभूषा आणि ऐतिहासिक प्रसंगांचे चित्रण यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
मंगळवारी सायंकाळी श्री.गो .से .हायस्कूलच्या प्रांगणात पीटीसी संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांच्या संकल्पनेतून महेश कोंडीण्य लिखित आणि दिग्दर्शित “सुवर्णयुग माझ्या शिवबाचे” या महानाट्याचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून या महानाट्याचे उद्घाटन झाले.


याप्रसंगी चेअरमन संजयनाना वाघ, नानासाहेब व्ही टी जोशी , दगाजीआण्णा वाघ , शालेय समिती चेअरमन खलीलदादा देशमुख, तांत्रिक विभाग प्रमुख वासुदेव महाजन, भडगावचे माजी नगराध्यक्ष श्यामकांत भोसले संस्थेचे संचालक. प्रा भागवत महालपुरे, जिजाबाई पाटील, अभिमन्यू पाटील ‘ शशिकांत चंदिले , मधुकर पाटील, सतीश चौधरी , प्रकाश पाटील , योगेश पाटील , किशोर डोंगरे , विश्वासराव साळुंखे , सुधीर पाटील ,नितीन तावडे , प्राचार्य डॉ शिरीष पाटील , डॉ एन एन गायकवाड, डॉ बी एन पाटील , डॉ वासुदेव वले , डॉ जे व्ही पाटील, दत्ता बोरसे,भूषण वाघ ,सुरज वाघ ,गौरव वाघ , आकाश वाघ कोमल वाघ,सुचेताताई वाघ , ज्योतीताई वाघ मुख्याध्यापिका प्रमिला वाघ , उपमुख्याध्यापक नरेंद्र ठाकरे, पर्यवेक्षक आर .एल .पाटील, ए.बी .अहिरे , पर्यवेक्षिका अंजली गोहिल , सांस्कृतिक प्रमुख रहीम तडवी.आदी उपस्थित होते.

या महानाट्यात श्री.गो .से. हायस्कूल मधील इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या 150 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. दोन तास चाललेल्या या महानाट्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक महत्वाचे प्रसंग सादर करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचा जन्म, शिक्षण, युद्धनीती, पावनखिंड, तानाजी मालुसरे, अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानावर हल्ला, स्वराज्य स्थापना आणि राज्याभिषेक यासारख्या अनेक प्रसंगांचे उत्कृष्ट चित्रण केले. यात प्रामुख्याने विद्यार्थी कलावंतांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदरची महाराष्ट्रातील स्थिती, आदिलशाही कुतुबशाही व मुस्लिम राज्यकर्त्यांची आंदोलने , ब्रिटिशांची गुलामगिरी , शहाजीराजांची सरदारकी , महाराष्ट्रातील जनतेवर वाढणारे अन्याय अत्याचार , शिवाजी महाराजांचा जन्म, शिवाजी महाराजांना जिजाऊ व सरदारां कडून मिळालेले शिक्षण , युद्धनीती , पावनखिंडीचा बाजीप्रभू देशपांडे यांचा पराक्रम , तानाजी मालुसरे यांनी घेतलेला कोंडाणा किल्ला , बडी बेगम साहेबांच्या दरबारात अफजलखानाने शिवाजी राजांना ठार करण्याचा उचललेला विडा ,शाहिस्तेखाना वरील हल्ला , शिवरायांनी जिंकलेले किल्ले , प्रतापगडावरील अफजलखानाचा वध यासह महिला , तरूण, शेती व शेतकरी यांच्या संरक्षणार्थ शिवरायांनी राबवलेली ध्येयधोरणे , हिंदवी स्वराज्याची स्थापना व शिवरायांचा अत्यंत नयनरम्य असा राज्याभिषेक सोहळा असे अनेक प्रसंग कसदार अभिनयातून विद्यार्थ्यांनी साकारले.

उत्कृष्ट वेशभूषा, दिव्यांची रंगसंगती, फटाक्यांची आतषबाजी, भगवे झेंडे आणि फेटे, प्रसंगानुरूप ध्वनी आणि पोवाड्याच्या माध्यमातून सादर केलेले हे महानाट्य श्री.गो .से .हायस्कूलच्या सर्व शिक्षकांनी व सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तसेच विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध काम केल्याबद्दल
प्रेक्षकांना विशेष आवडले त्यांनी सर्वांचे कौतुक केले.
सोबतच रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट आणि जयघोष करून विद्यार्थी कलाकारांचा उत्साह वाढवला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांनी केले. तर आर.बी. बोरसे यांनी सूत्रसंचालन केले.
महेश कौडीण्य यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी उपस्थित सर्व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला हजारो पालक शहरातील नागरिक उपस्थित होते.

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: CALL ME 8411009377 \\\\