आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
आरोग्य व शिक्षण

कोचिंग क्लासेसमध्ये 16 वर्षाच्या आतील विद्यार्थ्याला प्रवेश नाकारणेअन्यायकारक.



अमळनेर – सोळा वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग बंद या केंद्र शासनाच्या येऊ घातलेल्या कायद्यासाठी जो मसुदा तयार करण्यात आला,त्याच्या विरोधामध्ये PTA कोचिंग क्लासेस असोसिएशनने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर 4 मार्च रोजी,एकाच दिवशी एकाच वेळी तहसीलदार, जिल्हाधिकारी,मंत्री महोदय,आमदार आणि खासदार यांना निवेदने दिली.केंद्र सरकार एक नवीन कायदा
आणू इच्छित आहे. त्या कायद्याच्या आधारे 16 वर्षा खालील विद्यार्थ्यांना कोचिंग नाही असा हेतू मांडण्यात आला आहे. कोचिंग मुक्त भारत असा हेतू डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकार हा कायदा आणू पाहत आहे. सदरील कायद्यामुळे अगदी गाव खेड्यापासून ते राजधानीच्या शहरापर्यंत या कायद्याच्या विरोधात प्रत्येक जण आश्चर्य व्यक्त करीतआहेत. एवढेच नव्हे तर रागही व्यक्त करत आहे. शासनाच्या (सेंट्रल गव्हर्नमेंट) कोचिंग क्लासेस विरोधातील जाचक अटी
रद्दबातल करण्यात याव्या म्हणून अमळनेर PTA तर्फे-4 मार्च रोजी मदत व पुनर्वसन मंत्री-आदरणीय नाम. दादासो श्री.अनिल भाईदास पाटील तसेच अमळनेर विभाग
प्रांताधिकारी मान.महादेव खेडकर साहेब यांना निवेदन देण्यात आले.
आदरणीय मंत्री साहेब व प्रांत साहेब सदर निवेदन मान.मुख्यमंत्री साहेब यांच्या पर्यंत पोहचविणार आहेत.
यावेळी PTA क्लासेस संघटना अध्यक्ष भैय्यासाहेब मगर,महेश बढे, विनोद जाधव,राकेश बडगुजर, किरण माळी,शेखर कुळकर्णी, सुरश्री वैद्य,शर्मिला बडगुजर,
स्वाती पाटील,परेश गुरव,ज्ञानेश्वर मराठे,धिरज पवार,अनिल माळी, आर.आर.महाजन,सुधिर टाकणे, हर्षल बडगुजर, सुनिल पाटील, अविनाश कोळी,आरिफ पिंजारी यांची उपस्थिती होती.

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

बातमी लाईक  करा,शेअर करा

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!