पाचोरा महाविद्यालयात गणित विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांनी सादर केले आकर्षक पोस्टर व पॉवर पॉईंट प्रेझेंटशन
पाचोरा – पाचोरा तालुका सह. शिक्षण संस्था संचलित श्री एम एम वरीष्ठ महाविद्यालय पाचोरा येथे गणित विभागाचे ‘Application of Mathematics in Various Field’ या विषयावर विद्यार्थ्यांनी आकर्षक पोस्टर व पॉवर पॉईट प्रेझेंटेशन सादर केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे व्हा. चेअरमन नानासाहेब व्ही टी जोशी तर त्यांच्या समवेत व्यासपिठावर प्रमुख पाहुणे म्हणुन प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, उपप्राचार्य डॉ वासुदेव वले, उपप्राचार्य डॉ. जे.व्ही.पाटील IQAC समन्वयक मा. प्रा. एस. टी. सुर्यवंशी होते
कार्यक्रमाचा प्रारंभ सरस्वती पुजन करून करण्यात आला तद्नंतर गणित विभागाच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
पोस्टर व पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन करण्याचा उद्देश
विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण करणे आणि त्यांना या विषयात अधिक रस घेण्यासाठी प्रोत्साहित करणे असा होता. आपल्या पुणे येथील फर्ग्युसन कॉलेज जिवनातील अनुभव सांगताना आवर्जून सांगितले की अशा कार्यक्रमामुळे आम्हाला आमच्या अंगी असलेल्या विविध पैलू सादर करता आले आणि अभ्यासु व संशोधन वृत्ती जागृत करता आली
असाच एक प्रयत्न आज आपल्या महाविद्यालयात होत आहे याचा आनंद आहे असे प्रा.डॉ. वैष्णवी महाजन यांनी प्रास्ताविकात सांगितले.
विद्यार्थ्यांनी विविध व्हिज्युअल्स आणि ॲनिमेशनचा वापर करून प्रेझेंटेशन अधिक आकर्षक बनवले. या प्रेझेंटेशनमध्ये गणितातील कोडी, गणिताचा इतिहास आणि गणिताचे दैनंदिन जीवनातील उपयोग यांसारख्या विषयांचा समावेश कसा करता येतो यावर एकुण 9 विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले त्यापैकी उत्कृष्ठ पॉवर पॉइंट व पोस्टर सादरीकरण केल्या बद्दल अनुक्रमे प्रथम आकांशा जगदीश पाटील, द्वितीय सुकन्या बापु गीते, तृतीय सृष्टी संजय अहिरे या विद्यार्थिनींना प्रा. राजेंद्र चिंचोले लिखीत स्पर्धीपरिक्षा सारथी पुस्तक, पेन व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले तर ईतर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पेन मान्यवरांच्या शुभहस्ते देण्यात आले.
यावेळी प्राचार्य डॉ शिरीष पाटील यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रेझेंटेशन खुपच उत्कृष्ट आणि माहितीपुर्ण होते. त्यांनी या विषयावर चांगली पकड दर्शविली आणि प्रेझेंटेशन अधिक आकर्षक बनवण्यासाठी नवीन कल्पनांचा वापर केला. याचे आपल्या मनोगतातुन कौतुक केले आपल्या महाविद्यालया कडून अशा प्रकारचे कार्यक्रम सतत आयोजित केले जातात असे सांगीतले
तर अध्यक्षीय भाषणात नानासाहेब व्ही.टी.जोशी यांनी विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण होते आणि त्यांनी विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे वळले पाहिजे व पावर पॉइंट प्रेझेंटेशन सारख्या ICT आणि e-learning प्रणालीचा यशस्वीरित्या उपयोग व्याख्यानासाठी या प्रमाणे भविष्यात पण NEP चा वापर जास्तीत जास्ती केले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. पॉवर पॉइंट आणि पोस्टर प्रेझेंटेशनचे परिक्षक म्हणुन प्रा. अतुल पाटील व डॉ. शारदा शिरोळे यांनी सहकार्य केले. तर कार्यक्रमास विशेष उपस्थिती व यशस्वीतेसाठी सहकार्य प्रा.प्रदीप रुद्रसवाड, प्रा. प्राजक्ता शितोळे, प्रा. शितल पाटील डॉ. के. एस. इंगळे, डॉ. एस. बी. तडवी , प्रा. आर. बी. वळवी, डॉ. क्रांती सोनवणे, प्रा. अतुल पाटील, डॉ. माणिक पाटील, डॉ. शारदा शिरोळे, प्रा. स्वप्नील भोसले, प्रा. प्रदीप रुद्रसवाड, डॉ. प्राजक्ता शितोळे, प्रा. सुवर्णा पाटील, प्रा. मेघा गायकवाड, डॉ. सीमा सैंदाणे, प्रा. प्राजक्ता देशमुख, प्रा. सरोज अग्रवाल, प्रा. संजिदा शेख, प्रा. स्वप्नील पाटील, प्रा. रोहित पवार, प्रा. संदीप द्राक्षे, श्री. विजय पाटील, श्री. विजय सोनजे, श्री. उमेश माळी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्राजक्ता देशमुख व प्रा. सरोज अग्रवाल तर आभार प्रा. सुवर्णा पाटील यांनी मानले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377