इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्यासाठी २० जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई, दि. 16: परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या महाराष्ट्रातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरिता शिष्यवृत्ती निवडीसाठी विजाभज, इमाव व विमाप्र विभागाकडून दिनांक २३ मे २०२२ रोजीच्या जाहिरातीनुसार दिनांक २३ जून २०२२ पर्यंत सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत पोस्टाने व समक्ष अर्ज मागविण्यात आले होते. आता हे अर्ज सादर करण्याची मुदत दिनांक २० जुलै २०२२ पर्यंत सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत वाढविण्यात येत आहे असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



