अन्न व औषध प्रशासन गुप्त्वार्ता विभागाची धडक कारवाईप्रतिबंधीत अन्न पदार्थांचा ४८ लाख रुपये किमतीचा साठा जप्त

नशिराबाद(जळगांव) दि 29 – अन्न् व औषध प्रशासनाचे गुप्तवार्ता विभागास नशिराबाद परिसरात राज्यात बंदी असलेला विमल पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा चोरट्या पध्दतीने वाहतूक व विक्री करण्याचा व्यवसाय एका गोडवून मधून चालत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त् झाली.
त्या अनुशंगे प्रशासनाचे गुप्तवार्ता पथकाने सापळा रचून नशिराबाद येथील जय मुंजोबा पेपर बोर्ड कारखान्याचे मागील बाजूस असलेल्या गोडावून वर छापा घातला टाटा ultra बनावटीचे एका वाहनातून गोडाऊन मध्ये राज्यात बंदी असलेला विमल पानमसाला व v१ सुगंधित तंबाखूचा साठा उतरवत असताना मिळून आला. प्रशासनाचे अधिकारी यांनी कारवाई करत सुमारे ४८ लाख २७ हजार ९०० रुपये इतक्या किमतीचा प्रतिबंधीत अन्न पदार्थांचा साठा , वाहन किंमत सुमारे १० लाख रुपये मात्र असा एकूण ५८ लाख २७ हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतला. साठा आढळून आलेले गोडाऊन पुढील तपास कामी सिल करण्यात आले आहे.

सदर प्रकरणी गोडाऊन मध्ये काम हजार इसम नामे मिथुन कुमार सहनी राहणार बिहार, अजयकुमार साहनी राहणार बिहार, फरार वाहन चालक अब्दुल झहीर खान राहणार खरजना इंदोर, वाहन मालक बलविर सिंह बग्गा राहणार इंदोर, क्रेटा वाहन क्र म्ह २७ DE ९९०९ ya वाहनातून फरार झालेला मामा (पूर्ण नाव उपलब्ध नाही)नामक मॅनेजर तसेच जागा मालक व साठामालक यांचे विरोधात नशिराबाद पोलीस स्टेशन ला गुन्हा नोंद करण्यात आला असून मुख्य साठा मालक, पुरवठादार यांचा शोध घेणे तसेच गुन्ह्यात सहभागी छुपे भागीदार याचेबाबत पुढील तपास नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करत आहेत.
सदर कार्यवाही ही अन्न व औषध प्रशासन विभागच्या राज्याचे गुप्त्वार्ता विभागाचे प्रमुख श्री राहुल खाडे सह आयुक्त (दक्षता), मुंबई व नाशिक विभागाचे सह आयुक्त श्री संजय नारागुडे यांचे मार्गदर्शनाखाली श्री अविनाश दाभाडे, अन्न सुरक्षा अधिकारी (गुप्तवार्ता) नाशिक, श्री यदुराज दहातोंडे, अन्न सुरक्षा अधिकारी गुप्तवार्ता नागपूर, श्री संदीप सूर्यवंशी, अन्न सुरक्षा अधिकारी गुप्तवार्ता अमरावती श्री शरद पवार, अन्न सुरक्षा अधिकारी जळगाव, यांच्या संपूर्ण पथकाने केली असून श्री शरद पवार अन्न सुरक्षा अधिकारी जळगाव यांनी फिर्याद दिली आहे.
सहआयुक्त(नाशिक विभाग) ,अन्न व औषध प्रशासन,नाशिक
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



