भाजपा जळगाव महानगर तर्फे जळगाव रेल्वस्थानक परिसरात ‘सेवा पंधरवडा’ अभियान अंतर्गत स्वच्छता अभियान

जळगाव, दि 1 – भाजपा जळगाव महानगरच्या वतीने पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्ताने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा पंधरवडा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने आज राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगराच्या वतीने स्वच्छता अभियान जळगाव रेल्वे स्टेशन परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले यावेळी युवा खासदार उन्मेशदादा पाटील, जळगाव शहराचे आ. सुरेश भोळे( राजूमामा), माजी आमदार स्मिताताई वाघ,जळगाव ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज पाटील जळकेकर, महानगर अध्यक्षा उज्वलाताई बेंडाळे, लोकसभा क्षेत्र प्रमूख डॉ.राधेश्याम चौधरी , युवा मोर्चा महानगर अध्यक्ष आनंद सपकाळे यांच्यासह आजी माजी नगरसेवक, कार्यकर्ते,पदाधिकारी उपस्थित होते.रेल्वे स्टेशन परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ रेल्वे स्टेशन परिसरात मान्यवरांनी स्वच्छता करीत परिसर झाडून काढला.याप्रसंगी विधानसभा निवडणूक प्रमुख विशाल त्रिपाठी, माजी स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, स्वच्छता अभियानाचे प्रमुख राहुल वाघ, महिला प्रदेश सचिव रेखाताई वर्मा यांच्यासह जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष व पदाधिकारी, मोर्चा/ आघाडी अध्यक्ष व पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



