
जळगाव दि. 10 : चोपडा आणि जळगाव तालुकावासियांना वरदान ठरणाऱ्या निम्न तापी पाडळसरे मध्यम प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या तापी नदीवरील खेडीभोकरी ते भोकर दरम्यानच्या तापी नदीवरील मोठ्या पुलाचे १३ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार असून या कार्यक्रमासाठी वाहतूक व्यवस्था, बैठक व्यवस्थेसह सर्व गोष्टीचे व्यवस्थित व सुक्ष्म नियोजन करण्याच्या सुचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी घेतलेल्या आढावा बैठकीत दिल्या.
अजिंठा विश्रामगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दाै-याच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिप सीईओ डाॅ. पंकज आशिया, मनपा आयुक्त विद्या गायकवाड, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी,निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. किरण पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत येळाई व प्राजंल पाटील, प्रांताधिकारी महेश सुधळकर, तहसीलदार नामदेव पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
चोपडा आणि जळगाव तालुकावासियांना वरदान ठरणाऱ्या निम्न तापी पाडळसरे मध्यम प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या तापी नदीवरील खेडीभोकरी ते भोकर दरम्यानच्या तापी नदीवरील या पुलामुळे तीन तालुक्यांसोबत गुजरात व मध्यप्रदेशच्या वाहनधारकांनाही लाभ होणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

यासोबतच शिवाजी नगर येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण, म्हसावद येथील रेल्वे उड्डाणपुलाचे भूमीपूजन, बांभोरी येथील गिरणा नदीवरील मोठ्या पुलाचे भूमिपूजन यासह धरणगाव तालुक्यातील विविध कामांचे ई-भुमीपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असल्याने या सर्व कार्यक्रमांचे सुक्ष्म नियोजन करण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी कार्यक्रमाचे व सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्याचे सांगितले.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



