आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
राजकीय
Trending

नगरदेवळा – बाळद जि. प. गटातील ५ वि. का. सोसायटींची निवडणूक बिनविरोध

पाचोरा दि 2.- तालुक्यातील नगरदेवळा – बाळद या जिल्हा परिषद गटातील ५ विकास सोसायट्यांची निवडणुका ह्या येथील जि. प. सदस्य रावसाहेब पाटील यांच्या प्रयत्नातून बिनविरोध झाली आहे. बिनविरोध निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार पाचोरा – भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते त्यांच्या “शिवालय” या निवासस्थानी करण्यात आला. तालुक्यातील नगरदेवळा – बाळद गटातील वडगाव (मुलाने) – निपाणे विकास सोसायटी (१३ सदस्य), दिघी विकास सोसायटी (१३ सदस्य), आखतवाडे विकास सोसायटी (१३ सदस्य), वडगाव स्वामीचे (१३ सदस्य), घुसर्डी – होळ विकास सोसायटी (१३ सदस्य) या ५ विकास सोसायट्यांची निवडणुक ही या गटाचे जि. प. सदस्य रावसाहेब पाटील यांच्या प्रयत्नातून बिनविरोध झाल्या आहेत. नवनिर्वाचित सदस्यांचा आमदार किशोर आप्पा पाटील यांनी त्यांचे “शिवालय” या निवासस्थानी पुष्पहार घालून व पेढे भरवुन सत्कार केला. यावेळी रावसाहेब (मनोहर) गिरधर पाटील जि.प.सदस्य उपस्थित होते.

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!